मुंबई - जेव्हा मंचावर बॉलिवूड ड्रीम गर्ल हेमा मालिनी येते तेव्हा तिला नृत्य करायला न सांगणे हे चुकीचे ठरते. हेमा मालिनी सुपर डान्सरच्या सेटवर पाहुणी म्हणून पोहोचली होती. यावेळी तिने डान्स रियालिटी शोच्या सेटवर पुन्हा एकदा 70 च्या दशकाची जादू दाखवली. धर्मेंद्र यांच्या गाजलेल्या 'जट्ट यमला पगला दिवाना' या गाण्याच्या आयकॉनिक डान्स मूव्ह्सवर प्रेक्षकांना खिळवून ठेवले. अभिनेत्री शिल्पा शेट्टीने तिला डान्समध्ये साथ दिली.
हेमा मालिनी यांनी पती धर्मेंद्रच्या गाजलेल्या गाण्यावर डान्स केला त्याची झलक आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. धर्मेंद्र यांचे 'जट्ट यमला पगला दिवाना' हे लोकप्रिय गाणे 'प्रतीज्ञा' या चित्रपटातील आहे. हा सिनेमा 1975 मध्ये रिलीज झाला होता.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
व्हिडिओ शेअर करत हेमा मालिनी यांनी लिहिले, "धरम जी के स्टेप्स करने का मजा ही कुछ और है! (धरम जीच्या स्टेप्स करण्याची मजा काही औरच आहे) शिल्पा शेट्टीसोबत परफॉर्मन्स करताना प्रत्येक क्षण एन्जॉय केला!"
शिल्पा शेट्टीने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर हा व्हिडिओ शेअर केला आणि लिहिलंय, "ड्रिम गर्ल हेमा मालिनीजी ने धारण किया है एक अलग रुप. मी त्यांचे धरमजींचा स्टेप्स सलग बघत आहे. ड्रीम गर्लसोबत डान्स करण्याचे स्वप्न पूर्ण झाले."
हेमा मालिनी आणि शिल्पा शेट्टी दोघेही उत्तम नृत्यांगणा आहेत. दोघींना एकाच गाण्यावर डान्स करताना पाहण्याचा हा दुर्मिळ योग सुपर डान्सरच्या सेटवर जुळून आला. यावेळी हेमा मालिनी पेस्टल गुलाबी साडीमध्ये मोहक नेकपीस परिधान केल्या होत्या, तर शिल्पा शेट्टीने मॅचिंग ज्वेलरीसह पॅटर्न प्रिंट लेहेंगा चोली परिधान केली होती.
या आठवड्याच्या शेवटच्या भागात हेमा मालिनी सुपर डान्सर 4च्या सेटवर पाहुण्या म्हणून येणार आहेत.
हेही वाचा - पाहा : 'मानिके मगे हिथे' गाण्याचा शिल्पा शेट्टीला चढला ज्वर