ETV Bharat / sitara

‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ मालिका प्रेक्षकांना आवडेल याची हार्दिक जोशीला खात्री

author img

By

Published : Aug 31, 2021, 4:37 PM IST

अभिनेता हार्दिक जोशी एका नवीन मालिकेतून प्रेक्षकांना भेटायला आला आहे. ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ या नव्या मालिकेतून तो पुन्हा छोटा पडदा गाजवण्यासाठी सज्ज झालाय. ही एक कौटुंबिक मालिका असून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करेल असा विश्वास त्याने व्यक्त केलाय.

अभिनेता हार्दिक जोशी
अभिनेता हार्दिक जोशी

‘तुझ्यात जीव रंगला’ मधील गोड ‘राणादा’ साकारणारा अभिनेता हार्दिक जोशी प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनला होता. त्या मालिकेच्या अभूतपूर्व यशानंतर हार्दिक एका नवीन मालिकेतून प्रेक्षकांना भेटायला आला आहे. ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ या नव्या मालिकेतून प्रेक्षकांचा लाडका राणा म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी एका नव्या भूमिकेतून सगळ्यांच्या भेटीला आलाय. त्याच्या या नवीन मालिकेबद्दल आणि भूमिकेबद्दल सांगताना तो म्हणाला, “मी आधी केलेल्या भूमिकांपेक्षा ही भूमिका खूपच वेगळी आहे. मी साकारत असलेला सिद्धार्थ हा एकत्र कुटुंबपद्धतीमध्ये वाढलेला आहे. कुटुंबीय पारंपरिक असल्यामुळे घरचं वातावरण देखील पारंपरिक आहे. सिद्धार्थ हा खूप प्रॅक्टिकल मुलगा आहे आणि त्याला स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे.”

‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ या मालिकेचे प्रोमो प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहेत. या मालिकेच्या प्रोमोजला प्रेक्षकांकडून आणि त्याच्या चाहत्यांकडून मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल हार्दिक म्हणाला, “या प्रोमोज मधून प्रेक्षकांनी मला वेगळ्या लूक मध्ये पाहिलं आहे त्यामुळे ते खूप उत्सुक आहेत मला या फ्रेश लुक मध्ये पाहायला. तुझ्यात जीव रंगला या मालिकेनंतर आता राणा या व्यक्तिरेखेतून बाहेर येऊन मी काहीतरी नवीन प्रेक्षकांसाठी सादर करणार आहे त्यामुळे प्रेक्षकांना मालिकेबद्दल खूप आतुरता आहे.”

‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ मालिका

याआधी राणादा सारखी लोकप्रिय भूमिका निभावल्यानंतर आता त्याच्या अगदी विरुद्ध भूमिका साकारताना हार्दिकला नक्कीच दडपण आलं असणार, त्यावर बोलताना तो म्हणाला, “नक्कीच थोडंसं दडपण आहे. अजूनही प्रेक्षक मला राणा म्हणून ओळखतात आणि त्याच नावाने हाक मारतात. त्यामुळे सिद्धार्थ म्हणून देखील माझी ओळख व्हावी यासाठी मी प्रयत्न करतोय. त्यासाठी भूमिकेची देहबोली, दिसणं, बोलणं यासगळ्याकडे मी खूप लक्ष देतोय. राणा हा खूप इमोशनल होता त्याउलट सिद्धार्थ हा खूप प्रॅक्टिकल आहे त्यामुळे विरुद्ध टोकाची भूमिका निभावताना मी माझे १०० टक्के देतो आहे. प्रेक्षक देखील राणा सारखंच सिद्धार्थवर पण प्रेम करतील याची मला खात्री आहे.”

हार्दिक ला या भूमिकेसाठी जेव्हा तुला विचारण्यात आलं तेव्हा त्याच्या प्रतिक्रियेबद्दल सांगताना तो म्हणाला, “झी हे माझं कुटुंब आहे त्यामुळे त्यांना नाही बोलणं माझ्यासाठी शक्यच नाही कारण या वाहिनीने मला याआधी देखील एक वेगळी ओळख दिली. मला जेव्हा या भूमिकेसाठी विचारण्यात आलं तेव्हा मी नाही बोलूच शकलो नाही. तसेच राणामुळे माझी तयार झालेली इमेज खूप वेगळी आहे आणि त्याच्यापेक्षा वेगळ्या भूमिकेसाठी मला विचारण्यात आलं त्यामुळे मी लगेचच होकार दिला.”

वेगळी भूमिका आणि स्वतःचे व्यक्तीमत्व यात हार्दिकला साम्य आहे असे वाटते, त्याला ‘या मालिकेतील तुझी भूमिका आणि तुझ्यामध्ये किती साम्य किंवा किती फरक आहे?’ असे विचारल्यावर तो उत्तरला, “मालिकेतील सिद्धार्थ हा प्रॅक्टिकल आहे आणि मी सुद्धा बऱ्यापैकी प्रॅक्टिकल आहे. तसंच सिद्धार्थप्रमाणे मला देखील एकत्र कुटुंबपद्धती आवडते. मला एकत्र कुटुंबपद्धती आवडते कारण घर नेहमी भरलेलं असतं. घरात सणासुदीचं वातावरण असतं. सगळे एकत्र असले की ती धमाल मस्ती असते त्यामुळे मला एकत्र कुटुंबपद्धती खूप आवडते.”

नवीन मालिका, नवीन सेट, नवीन कलाकार, नवीन टीम याबाबद्दल हार्दिक जोशी समाधानी आहे. “नुकतंच शूटिंग सुरु झालं आहे पण अगदी थोड्याच दिवसात आम्हा सगळ्यांची गट्टी जमली आहे त्यामुळे आता कुठे धमाल मस्तीला सुरुवात झाली आहे, त्यामुळे इथून पुढे किस्से हळू हळू रंगतील”, असे तो म्हणाला. प्रेक्षकांनी ही मालिका का पाहावी यावर बोलताना हार्दिक म्हणाला, “खूप वेगळा विषय घेऊन ही मालिका प्रेक्षकांसाठी झी मराठी वाहिनी सादर करत आहे. ही मालिका बघून प्रेक्षकांमध्ये एकत्र कुटुंबपद्धतीबद्दल प्रेम अजून वाढेल. कुटुंब आणि माणसं ही आयुष्यात किती महत्वाची आहेत हे सगळ्यांना कळेल. त्यामुळे या मालिकेचा आनंद प्रेक्षकांनी त्यांच्या संपूर्ण कुटुंबासोबत घ्यावा.”

हार्दिक जोशीची प्रमुख भूमिका असलेली ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ ही मालिका ३० ऑगस्ट पासून, झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

हेही वाचा - ‘टकाटक’च्या अभूतपूर्व ‘१ नंबर’ यशानंतर मिलिंद कवडे घेऊन येताहेत ‘एक नंबर’!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.