अहमदनगर - बॉलिवूडचे सुपरस्टार गोविंदा यांनी सहकुटुंबासोबत शिर्डीतील साई समाधीचे दर्शन घेतले. हिंदी चित्रपटसृष्टीत विविध भूमिका साकारत त्यांनी दोन दशके प्रेक्षकांवर अधिराज्य गाजवले आहे. आज त्यांचा मुलगा यशवर्धन, पत्नी सुनीता आणि मुलगी टीना यांच्यासमवेत शिर्डीत हजेरी लावली होती. साईबाबाच्या मध्यान्ह आरतीच्या वेळी त्यांनी साईबाबाचे दर्शन घेतले.
गोविंदा यांनी आपल्या कुटुंबावर सदैव साईबाबांची कृपा राहावी ही प्रार्थना केली. यावेळी राजकारणावर कोणतेही वक्तव्य करण्याचे त्यांनी टाळले. तर, चाहत्यांचे आभार मानुन साईबाबाच्या नावाचा जयजयकार करत ते निघुन गेले.
साईबाबांच्या मंदिर परिसरात मोबाईलवर बंदी असुनही चाहत्यांचा गोविंदासोबत सेल्फी घेण्याचा मोह आवरला नाही. साई संस्थानच्या सुरक्षा रक्षक कर्मचारी यांनी देखील यावेळी बघ्याची भूमिका घेतली. गोविंदासोबत सेल्फी घेण्यासाठी सुरक्षारक्षक देखील आपली जागा सोडुन गेल्याने मंदिराच्या सुरक्षेचे तीनतेरा वाजल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले.