हल्लीच्या जगात मनोरंजनसृष्टीला बरेच महत्व प्राप्त झाले आहे. खासकरून कोरोनाकाळातील लॉकडाऊनमध्ये लोकांना सक्तीने घरातच बसावे लागत होते किंवा लागत आहे, त्यावेळी मनोरंजनसृष्टीच त्यांच्या करमणुकीची काळजी घेत आली आहे. करमणूक म्हटलं की करमणूक करणारेही आहे. अभिनय, नृत्य, गायन ई तऱ्हेने लोकांची करमणूक करता येते. नवोदितांना त्यासाठी हवी असणारी संधी गामा फाऊंडेशनने उपलन्ध करून दिली. त्यांनी हिंदी चित्रपट कराओके गीत गायनाची सूरताल कराओके सिंगिंग स्टार या स्पर्धेचे आयोजन केले होते.
या स्पर्धेत मुंबईसह उपनगरांतील अनेक हौशी गायकांनी ऑनलाईन पद्धतीने सहभाग नोंदविला होता. एकापेक्षा एक अवीट गोडीच्या बहारदार सादरीकरणामुळे ही स्पर्धा रंगतदार व सुरस झाली होती. अंतिम फेरीसाठी स्पर्धकांची निवड करताना परीक्षकांचा कस लागला होता. आता स्पर्धकांची उत्सुकता जास्ती न ताणता आम्ही काही गोष्टी इथे जाहीर करत आहोत असे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे.
गामा फाऊंडेशनने आयोजित केलेल्या लोकप्रिय सदाबहार हिंदी चित्रपट कराओके गीत गायनाची सूरताल कराओके सिंगिंग स्टार या स्पर्धेची अंतिम फेरी आणि निकाल रविवारी ३० मे २०२१ रोजी सकाळी ११:०० वाजल्यापासून प्रत्यक्ष 'गामा फाऊंडेशन'च्या फेसबूक पेज वर लाईव्ह सादर होणार आहे.
कार्यक्रमाच्या स्पर्धेचे परीक्षक संगीत संयोजक प्रशांत लळित आणि गायिका विद्या करलगीकर आहेत. त्याच बरोबर या कार्यक्रमात विशेष सहभाग डॉ. राहुल जोशी(एम.डी.होमिओपथी) आणि आश्विन बापट यांचा सुद्धा सहभाग असणार आहे.
हेही वाचा - सावनी रवींद्रच्या घरी, “कुणी तरी येणार, येणार गं”!