ETV Bharat / sitara

मनोज बाजपेयीसोबत काम करण्यासाठी गजराज राव उत्सुक

अभिनेता गजराज राव व मनोज बाजपेयी दीर्घ काळानंतर पुन्हा एकत्र काम करीत आहेत. मनोज (बाजपेयी) यांच्याबरोबर काम करण्यास मी खूप उत्साही होतो, कारण सुमारे २०--३० वर्षांपूर्वी मी थिएटरच्या दिवसात त्यांच्याबरोबर खूप काम केले होते, असे गजराज यांनी म्हटलंय

author img

By

Published : Dec 8, 2020, 3:46 PM IST

Gajraj Rao
गजराज राव

मुंबई - 'एक्स-रे' या एंथोलॉजी मालिकेच्या आगामी भागात दशकांनंतर अभिनेता गजराज राव व मनोज बाजपेयी एकत्र काम करणार आहेत. इश्किया चित्रपट निर्माता अभिषेक चौबे या मालिकेचे दिग्दर्शन करणार आहेत. राव यांनी सांगितले, "मनोज (बाजपेयी) यांच्याबरोबर काम करण्यास मी खूप उत्साही होतो, कारण सुमारे २०--३० वर्षांपूर्वी मी थिएटरच्या दिवसात त्यांच्याबरोबर खूप काम केले होते."

कथा आणि त्यांच्या भूमिकेबद्दल ते म्हणाले, "मी या मालिकेबद्दल जास्त बोलू शकत नाही कारण असे न करण्याच्या करारावर मी सही केली आहे."

चौबे व्यतिरिक्त, वासन बाला आणि श्रीजित मुखर्जी यांनीही या मालिकेतील काही विभागांचे दिग्दर्शन केले आहे. वासन बालाच्या सेगमेंटमध्ये राधिका मदन आणि हर्षवर्धन कपूर आहेत, परंतु श्रीजित मुखर्जी यांच्या सेगमेंटविषयी अजून काही सांगता आलेले नाही.

हेही वाचा - वरुण धवन म्हणतो, कोरोनाच्या बाबतीत मी अधिक सावध राहायला हवे होते

राव म्हणाले, "मला वाटतं की आम्ही एक रंजक प्रकल्प शूट केला आहे आणि सध्या ते संकलनाच्या टप्प्यात आहेत. आशा आहे की येत्या 2 ते 4 महिन्यात प्रेक्षक हे पाहू शकतील."

सत्यजित रे यांच्या कामांवर आधारित ही कल्पित मालिका असेल. रिलायन्सच्या व्हायकॉम 18 च्या सहकार्याने नेटफ्लिक्स, कथाकार म्हणून सत्यजित रे यांच्या महान कामगिरीबद्दल आदरांजली वाहेल.

हेही वाचा - अभिनेत्री जारा खानला बलात्काराची धमकी देणाऱ्या 'तरुणी'ला अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.