ETV Bharat / sitara

'फ्रेंड्स'चं होणार रियुनियन, 'या' कारणासाठी येणार पुन्हा एकत्र - Jennifer Aniston And Her ‘Friends’ Co-Stars

एका कार्यक्रमाच्या भागात डेविड, जेनिफर, कटेर्नी, मैट, लिसा आणि मॅथ्यू पुन्हा एकत्र येणार आहेत. या सर्व कलाकारांनी फोटो शेअर करुन याबाबत माहिती दिली आहे.

Friends Serial cast Reunite for Show
'फ्रेंड्स'चं होणार रियुनियन, 'या' कारणासाठी येणार पुन्हा एकत्र
author img

By

Published : Feb 22, 2020, 11:41 PM IST

लॉस एंजेलिस - हॉलिवूडच्या 'फ्रेंड्स' या वेबसीरीजची आजही तरुणाईमध्ये क्रेझ पाहिली जाते. ही मालिका संपल्यानंतरही यातील कलाकारांची तुफान लोकप्रियता आहे. या मालिकेतील कलाकारांनी पुन्हा एकत्र यावे, अशी चाहत्यांची इच्छा होती. त्यांची हीच इच्छा पूर्ण करत फ्रेंड्सचे कलाकार, जेनिफर एनिस्टन, कॉर्टनी कॉक्स, लीजा कुडरो, मैट लेब्लांक, मॅथ्यू पेरी आणि डेविड श्वीमर हे पुन्हा एका कार्यक्रमाच्या भागात एकत्र येणार आहेत.

२००४ साली या मालिकेचा अखेरचा भाग प्रसारित झाला होता. त्यानंतरही या कलाकारांची सोशल मीडियावर क्रेझ आहे. नेटफ्लिक्सवर सर्वाधिक वेळा पाहिला जाणाऱ्या कार्यक्रमांमध्येही या मालिकेने स्थान मिळवले आहे.

होम एंटरटेनमेंटचे मालक वॉर्नर ब्रोस यांनी सांगितले आहे, की जेव्हा नेटफ्लिक्सवर 'फ्रेंड्स' ही मालिका प्रदर्शित केली जाणार होती तेव्हा डिजीटल व्यासपीठांवर या मालिकेची तीनपट जास्त कमाई झाली.

आता एचबीओ मॅक्स या वाहिनीवरील एका कार्यक्रमाच्या भागात डेविड, जेनिफर, कटेर्नी, मैट, लिसा आणि मॅथ्यू पुन्हा एकत्र येणार आहेत. या सर्व कलाकारांनी फोटो शेअर करुन याबाबत माहिती दिली आहे.

ट्विटरवरही 'फ्रेंड्स'च्या रियुनियनसाठी चाहते उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहेत. या मालिकेचे कार्यकारी निर्माता केविन ब्राईट, मार्ता कॉफमॅन आणि डेव्हिड यांच्यासोबत या विशेष कार्यक्रमाचे दिग्दर्शन केले जाणार आहे.

आलिया भट्टनेही दिली प्रतिक्रिया-

अभिनेत्री आलिया भट्ट देखील या मालिकेची खूप मोठी चाहती आहे. फ्रेंड्सच्या कलाकारांचं रियुनियन होणार असल्याचे समजताच आलियाने देखील आपल्या इन्स्टास्टोरीमध्ये आपला आनंद व्यक्त केला आहे.

alia bhatt
आलिया भट्टची पोस्ट

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.