ETV Bharat / sitara

फ्रेंड्स स्पेशल रियुनियन शो पुन्हा लांबणीवर - शो पुन्हा एकदा कोरोनाव्हायरस साथीमुळे लांबणीवर

एचबीओ मॅक्सची बहुप्रतिक्षित रियूनियन स्पेशल फ्रेंड्स शो पुन्हा एकदा कोरोनाव्हायरस साथीमुळे लांबणीवर पडला आहे. मार्चमध्ये हा शो प्रेक्षकांच्या उपस्थित होणार होता. त्यानंतर हा शो प्रेक्षकांशिवाय मे महिन्यात शूट होणार होता. मात्र अद्यापही याच्या तारखा ठरलेल्या नाहीत.

Friends reunion special
फ्रेंड्स स्पेशल रियुनियन शो
author img

By

Published : Aug 8, 2020, 3:20 PM IST

वॉशिंग्टन डीसी: १९९० च्या दशकात अमेरिकेमध्ये फ्रेंड्स ही सिटकॉम मालिका प्रचंड लोकप्रिय होती. या मालिकेतील कलाकारांच्या रियुनियनचा शो होण्यास उशीर झाला आहे. कोरोना व्हायरसच्या साथीमुळे हा शो पुढे ढकलण्यात आला होता.

व्हरायटीने दिलेल्या माहितीनुसार या शोच्या तारखा अद्याप ठरलेल्या नाहीत. या शोचे स्वरुप स्क्रिप्टेड असून याचे प्रसारण एचबीओ मॅक्स या चॅनलवर होणार आहे. रियुनियन शो प्रेक्षकांच्या उपस्थित करण्याचे मुळ नियोजन होते. हा शो मार्च महिन्यामध्ये होणार होता. परंतु त्याच काळात कोरोनाचे संक्रमण होऊ लागल्याने मनोरंजन जगत थांबले. त्यामुळे हा शोही पुढे ढकलण्यात आला होता. या शोचे शूटिंग उन्हाळ्याच्या अखेरीस करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

वॉर्नर मीडिया एन्टरटेन्मेंट आणि डायरेक्ट-टू-कन्झ्युमर चेअरमन बॉब ग्रीनब्लाट यांनी मे मध्ये म्हटले होते की, कंपनीला आशा आहे की मे महिन्याच्या अखेरपर्यंत शोचे शूटिंग होऊ शकेल. मात्र तसे होऊ शकलेले नाही आणि प्रचंड लोकप्रिय ठरु शकेल अशा या शोसाठी प्रेक्षकांना अजूनही प्रतीक्षा करावी लागणार आहे.

हेही वाचा - आयुष्यातील अनुभवांनी कथा सादर करण्यास मदत केली'

फ्रेंड्स ही लोकप्रिय मालिका लॉन्च झाली त्याला आता २६ वर्षे पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर होणारे कलाकारांचे रियुनियन चर्चेचा विषय होता. या कार्यक्रमात जेनिफर एनिस्टन, कॉर्टेनेय कॉक्स, लिसा कुद्रो, मॅट लेब्लांक, मॅथ्यू पेरी आणि डेव्हिड श्वामिर हे सर्व पुन्हा एकदा एकत्र येण्यासाठी उत्सुक आहेत.

वॉर्नर ब्रदर्सच्या बरबँकमधील स्टुडिओ लॉटवरील मूळ फ्रेंड्स साऊंड स्टेज 24 वर या भव्य शोचे शूटिंग पार पडणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.