ETV Bharat / sitara

‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेमध्ये होणार ‘गोरी मेम जेसिका’ची एन्ट्री! - श्रेयस तळपदे

“माझी तुझी रेशीमगाठ” ही मालिका ‘फॉरेन’ च्या वळणावर आली आहे कारण आता यात ‘गोरी मेम’ ची एन्ट्री होणार आहे. मालिकेत जेसिका या विदेशी मुलीचं आगमन होत आहे.

‘गोरी मेम जेसिका’ची एन्ट्री!
‘गोरी मेम जेसिका’ची एन्ट्री!
author img

By

Published : Feb 16, 2022, 8:00 PM IST

“माझी तुझी रेशीमगाठ” या मालिकेत श्रेयस तळपदे यशची भूमिका अत्यंत चोख बजावतोय. तसेच या मालिकेमध्ये त्याच्यासोबत प्रार्थना बेहेरे नेहा कामत ही भूमिका साकारताना दिसतेय. मायरा वायकुळच्या निरागस अभिनयाने महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. आता ही मालिका ‘फॉरेन’ च्या वळणावर आली आहे कारण आता यात ‘गोरी मेम’ ची एन्ट्री होणार आहे. मालिकेत जेसिका या विदेशी मुलीचं आगमन होत आहे.

झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका लोकप्रिय बनली आहे. या मालिकेत नुकतंच प्रेक्षकांनी पाहिलं की नेहाला देखील तिचं यशवर प्रेम असल्याचं जाणवतंय. जेसिकाच्या एन्ट्रीमुळे मालिकेत विलक्षण वळण येणार आहे. पण तिने अजून हि गोष्ट कबूल केली नाहीये. जेसिका ही यशची एक्स गलफ्रेंड आहे हे समीर नेहाला सांगतो.

‘गोरी मेम जेसिका’ची एन्ट्री!
‘गोरी मेम जेसिका’ची एन्ट्री!

पण कोण आहे ही जेसिका, हा प्रश्न प्रेक्षकांना नक्कीच सतावत असणार. जेसिका ही व्यक्तिरेखा रशियन अभिनेत्री जेन कटारिया निभावत आहे. नेहाला या जेसिकामुळे होणारी जेलसी समीर हेरतो, हीच गोष्ट यशला देखील कळेल का? यशसाठी असलेलं प्रेम जेसिकाच्या येण्यामुळे नेहा व्यक्त करू शकेल का हे प्रेक्षकांना मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळेल.

हेही वाचा - राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री उषा जाधवने लावली ‘स्पॅनिश गोया अवॉर्ड्स २०२२’मध्ये हजेरी!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.