ETV Bharat / sitara

विमान अपघातात आयजा खानच्या निधनाची 'फेक न्यूज', अफवांवर भडकली आयजा - Ayeza Khan death news

कराचीमध्ये झालेल्या विमान अपघातात पाकिस्तानी अभिनेत्री आयजा खान हिचा पतीसह मृत्यू झाल्याची अफवा सोशल मीडियावर पसरली होती. स्वतः आयजाने आपण ठिक असल्याचे सांगत या बातमीबद्दल संताप व्यक्त केलाय.

Aiza Khan
अभिनेत्री आयजा खान
author img

By

Published : May 23, 2020, 6:38 PM IST

मुंबई - पाकिस्तानातील कराचीमध्ये विमानतळानजिक विमानाचा दुर्दैवी अपघात झाला. यामध्ये ९७ लोकांना आपला जीव गमवावा लागला. त्यानंर सोशल मीडियामध्ये पाकिस्तानी अभिनेत्री आयजा खान आणि तिच्या पतीचे विमान अपघातात निधन अशा अफवा परसल्या. ही अफवा वाऱ्याच्या वेगाने पसरली. त्यानंतर काही वेळातच स्वतः आयजा खान हिने आपण सुखरुप असल्याचे आणि ही बातमी एक अफवा असल्याचे स्पष्ट केले.

आयजाने लिहलंय, ''अशा प्रकारे अफवा पसरवणे बंद करा. मी आणि माझा पती पूर्ण ठिक आहोत. अल्लाह अशा लोकांना अशी बुध्दी देवो ज्यामुळे ते पुन्हा असे लिहिणार नाहीत. अल्लाह आपल्या सर्वांना सुखरुप ठेवेल आणि या अपघातात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना धीर देईल.''

आयजाचे पती दानिश तैमुरने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यातून त्याने या फेक न्यूजचा खुलासा केलाय.

आयजा खान ही पाकिस्तानची प्रसिध्द अभिनेत्री आहे. तिने अनेक टीव्ही मालिकांमधून काम केले आहे. 'अफजल', 'मेरी जिंदगी है तू', 'सारी भूल हमारी थी', 'थोड़ा सा हक' आणि 'अधूरी औरत' या तिच्या गाजलेल्या मालिका आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.