मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री ईशा देओल चित्रपटांपासून दूर आपल्या संसारात व्यस्त आहे. दोन वर्षांपूर्वी तिच्या घरी एका चिमुकलीचे आगमन झाले होते. आता पुन्हा एकदा ती आई होणार आहे. तिने तिच्या 'बेबी शॉवर'चे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
ईशा देओलने बॉलिवूडमध्ये फारच कमी चित्रपटात काम केले आहे. त्यानंतर तिने भारत तख्तानीसोबत लग्न केले. तिला राध्या नावाची मुलगी आहे. आता पुन्हा एकदा तिच्या घरी नवीन पाहुण्याचे आगमन होणार आहे.
'तब्बल दोन वर्षांनंतर मी हा क्षण पुन्हा अनुभवत आहे. मी माझ्या मित्रमंडळींचे आणि कुटुंबाचे आभार मानते, त्यांनी मला ही खास भेट दिली आहे', असे तिने तिच्या फोटोंवर कॅप्शन दिले आहे.