मुंबई - डिस्कव्हरी चॅनेल यावर्षी मार्चमध्ये भारतात लाँच झाले होते. त्यानंतर त्यांनी आता भारतात स्ट्रीमिंग सेवा सुरू करण्यासाठी प्रसारणाचा मुळ आशय इथेच निर्माण करण्याचे ठरवले आहे. यासाठी चॅनलने मनोज बाजपेयी, राणा दग्गुबाती, नीरज पांडे आणि रणदीप हुडा अशा बॉलिवूड दिग्गजांना यात सहभागी करुन घेतले आहे. हे लोक त्यांची योजना पुढे घेऊन जातील.
हेही वाचा - कंगना रणौतला कायदेशीर नोटीस, अभद्र ट्विटवर माफी मागण्याची शीख संस्थेने केली मागणी
९ डिसेंबरपासून ओटीटी प्रसारण सुरू करण्याची योजना आहे. लाईन अप करण्यात आलेल्या आशयामध्ये 'मिशन फ्रंटलाइन' मध्ये 'राणा दग्गुबाती', 'लडाख वॉरियर्स: द सन्स ऑफ द सॉइल' हे रणदीप हूडाचे हिंदी चित्रपट आणि 'सिनाली का रहस्य : डिस्कव्हरी ऑफ द सेंच्युरी' या चित्रपटाचा समावेश आहे. नीरज पांडे आणि मनोज बाजपेयी याचे होस्ट असतील.
हेही वाचा - कंगना राणावतचे ट्विटर अकाउंट बंद करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल