‘द कपिल शर्मा शो’ जेव्हापासून सुरु झालाय तेव्हापासून तो प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. विनोदी अभिनेता आणि स्टॅन्ड अप कॉमेडियन कपिल शर्माचा निर्भेळ विनोद प्रेक्षकांना तर आवडतोच परंतु मोठमोठे बॉलिवूड स्टार्स सुद्धा या शोचे आणि अर्थातच कपिल शर्मा चे फॅन्स आहेत. शाहरुख खान, सलमान खान जो या शोचा निर्माता देखील आहे, आमिर खान, रणवीर सिंग, रणबीर कपूर, अनुष्का शर्मा, आलिया भट, दीपिका पदुकोन, अक्षय कुमार, ऐश्वर्या राय बच्चन आणि इतर असंख्य बॉलिवूडकर या शोचे चाहते आहेत. त्यांच्यासोबत त्यांच्या फॅमिलीजसुद्धा हा शो आवर्जून बघतात. तसेच ‘द कपिल शर्मा शो’चे निमंत्रण मिळणे ही एक प्रतिष्ठेची बाब बनली आहे आणि सर्वच छोटे-मोठे कलाकार या शोमध्ये येण्यासाठी उत्सुक असतात, अगदी एका पायावर तयार असतात.
सहाएक महिन्यांपूर्वी ‘द कपिल शर्मा शो’ ने ब्रेक घेतला होता. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रहार होण्यापूर्वी कपिल शर्माने आपल्या कुटुंबियांसमवेत वेळ घालविण्यासाठी हा शो थोड्या काळाकरता थांबविला होता. एकाअर्थी ते त्याच्या पथ्यावरच पडले कारण एप्रिलपासून महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन लागला आणि सर्व प्रकारच्या शूटिंग्सवर बंदी घालण्यात आली होती. आता कोरोनाची दुसरी लाट ओसरत असून अनेक चित्रपट, मालिकांचे चित्रीकरण जोमाने सुरु झाले आहे. ‘द कपिल शर्मा शो’ ने काही महिन्यांपूर्वी विश्रांती घेतली होती आणि आता तो एका नवीन सीझनसह प्रेक्षकांसमोर येण्यासाठी सज्ज आहे. विनोदी कलाकार आणि अभिनेता कपिल शर्मा आपली ‘विनोदाची-बुलेट-ट्रेन’ ‘टीकेएसएस’ (TKSS ) घेऊन परत येत आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
यापूर्वीच्या हंगामातील नियमित विनोदी कलाकार कृष्णा अभिषेक, किकू शारदा, भारती सिंग, सुमोना चक्रवर्ती, चंदन प्रभाकर आणि 'चेअरपर्सन' अर्चना पूरन सिंह या शोद्वारे परतत आहेत. याआधी या शोचा हिस्सा असलेली मॉडेल-अभिनेत्री रोशेल राव पुनरागमन करीत असून नव्या सिझन मध्ये विनोदी कलाकार सुदेश लेहरी आणि गौरव गेरा यांची वर्णी लागली आहे. पहिल्या आठवड्यात अजय देवगण आणि अक्षय कुमार यांचे अनुक्रमे ‘भुज’ आणि ‘बेलबॉटम’ या चित्रपटांमधील कलाकार हजेरी लावताना दिसतील आणि हास्याचे फवारे उडताना दिसतील.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
कपिल शर्माने वेळोवेळी तो ही-मॅन’ धर्मेंद्रचा भलामोठा चाहता असल्याचे सांगितले आहे. त्याचे शोच्या पहिल्या भागाचा प्रथम अतिथी धर्मेंद्रच होता आणि पुढे अनेकदा कपिलने धर्मेंद्रला आपल्या शोमध्ये निमंत्रित केले आहे. आता पुढील वीकेंड एपिसोडमध्ये पुन्हा एकदा धर्मेंद्र ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये येणार आहे. त्याच्यासोबत शत्रुघ्न सिन्हा ‘टीकेएसएस’ च्या सेटवर येणार आहेत. त्यांचे एक वेगळे नातेसुद्धा आहे. शत्रुघ्न सिन्हा धर्मेंद्रची पत्नी हेमा मालिनीला बहीण मानतो आणि हेमा त्याला दरवर्षी राखी बांधते. नुकताच समाज माध्यमावर धर्मेंद्रने ‘द कपिल शर्मा शो’ च्या सेटवर टिपलेला क्षण शेअर केला. त्याने शत्रुघ्न सिन्हा आणि कपिल शर्मा यांच्याबद्दल असलेले प्रेम आणि आदर व्यक्त करताना लिहिले की या एपिसोडमध्ये ‘सुंदर आठवणींचा मजेदार मेळा’ सादर होताना दिसेल.
हेही वाचा - सिने निर्माते आणि ज्येष्ठ मीडिया पर्सन प्रदीप गुहा यांचे निधन