ETV Bharat / sitara

'बोरं पावरी चल रही है' म्हणत, देवदत्त नागेच्या ‘पोरांनी’ केली ‘बोरांची’ पार्टी! - डॉक्टर डॉनच्या सेटवर कलाकारांची धमाल

सध्या ‘पावरी चाल रहीं हैं’ भरपूर ट्रेंड होत आहे. यात बॉलिवूडची मोठमोठी स्टार मंडळीदेखील आहेत, आपापल्या पद्धतीने याची नक्कल करतानाचे व्हिडीओज समाज माध्यमांवर पोस्ट करीत आहेत. यात मराठी कलाकारही मागे नाहीत. नुकतेच ‘डॉक्टर डॉन’ या मालिकेच्या सेटवर देवदत्त नागे यानेही या ट्रेंडिंग संदर्भात एक विनोदी व्हिडीओ पोस्ट केलाय, 'बोरं पावरी चल रही है' म्हणत.

devdutt-nage
देवदत्त नागे
author img

By

Published : Mar 2, 2021, 7:50 PM IST

मुंबई - सध्या ‘पावरी चाल रहीं हैं’ भरपूर ट्रेंड होत आहे. एका पाकिस्तानी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने आपल्या हॅण्डलवर काही कलाकार व मॉडेल्स इंग्रजी हाय-फाय पद्धतीत कसे बोलतात हे पोस्ट केले व काही तासांतच ते ट्रेंडिंग होऊ लागले. ‘ये मैं हूँ, ये मेरी टीम हैं और हमारी पावरी हो रही हैं’ हे (इंग्रजाळलेल्या इंग्लिशमध्ये बोलताना, ज्यात पार्टी, पावरी सारखे ऐकू येते) वाक्य फेमस झालंय व अनेकजण, यात बॉलिवूडची मोठमोठी स्टार मंडळीदेखील आहेत, आपापल्या पद्धतीने याची नक्कल करतानाचे व्हिडीओज समाज माध्यमांवर पोस्ट करीत आहेत. यात मराठी कलाकारही मागे नाहीत. नुकतेच ‘डॉक्टर डॉन’ या मालिकेच्या सेटवर देवदत्त नागे यानेही या ट्रेंडिंग संदर्भात एक विनोदी व्हिडीओ पोस्ट केलाय, 'बोरं पावरी चल रही है' म्हणत.

झी युवावरील डॉक्टर डॉन या मालिकेची कथा हटके आहेच पण यातल्या कलाकारांनी आपल्या अभिनयाने या कथेला चांगला न्याय दिलाय व त्यामुळे मालिकेला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळतोय. यातील जवळपास सर्वच कलाकार सोशल मीडियावर ऍक्टिव्ह आहेत. सोशल मिडीयावरुन आणि वैयक्तिक स्तरावरही यातल्या कलाकारांना प्रेक्षकांची पसंतीची पावती मिळतेय. सध्या सोशल मीडियावर चालत असलेल्या 'पावरी चल रही है' या ट्रेंडला अनुसरून देवदत्त नागे याने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. सेटवरच्या आवारात असलेल्या बोराच्या झाडावरून डॉक्टर डॉनच्या पोरांची टीम बोरं काढतेय. यावर देवदत्त नागेने "ये हम है, ये हमारी शूटिंग कि पोरं है, और ये हमारी बोरं कि पावरी चल रही है" असं म्हणत देवदत्तने हा व्हिडीओ शेअर केला आहे.

डॉक्टर डॉनच्या सेटवर कलाकारांची धमाल चालूच असते. ऑनस्क्रीन हे कलाकार जेवढा कल्ला करतात तितकंच ऑफस्क्रीन देखील त्यांची मस्ती चालू असते. देवदत्त नागेच्या या धमाल व्हिडिओवर प्रेक्षक-चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
हेही वाचा - हॅप्पी बर्थ डे टायगर श्रॉफ : बागी ते रॅम्बो पर्यंतचा अॅक्शन प्रवास

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.