नाशिक - नाशिक मध्ये कोरोना सदृश रुग्ण आढळून आल्यानं नाशिककरामध्ये भीतीचे वातावरण आहे. खबरदारी म्हणून शासनानेदेखील शाळा, महाविद्यालय, चित्रपट गृह, नाट्यगृह, मॉल , उद्याने 31 मार्च पर्यंत बंद ठेवली आहेत. असं असलं तरी नाशिककरांनीं गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावे असं आवाहन अभिनेता अभिजीत खांडकेकर याने केलं आहे.
तसंच कोरोना बाबत येणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नका चुकीचे मॅसेज फॉरवर्ड करू नका असंही अभिजीतने म्हटलं आहे.