ETV Bharat / sitara

यशोमन, मयूरी, सुयश, निवेदिता आणि भरतचं अफलातून समीकरण, 'कम्फर्ट नात्यांचा'!

author img

By

Published : Mar 26, 2022, 4:43 PM IST

नवीन लघुपट आलाय ज्याचं नाव आहे ‘कम्फर्ट नात्यांचा' ज्यातून प्रथमच यशोमन, मयूरी, सुयश, निवेदीता आणि भरतचं अफलातून समीकरण पहायला मिळणार आहे. कुटुंबातील नातेसंबंधात बाप लेकीच्या नात्याची बात काही औरच असते. अशी बाप लेकीची कथा 'कम्फर्ट नात्यांचा'' या लघुपटात सांगण्यात आली आहे.

कम्फर्ट नात्यांचा नवीन लघुपट
कम्फर्ट नात्यांचा नवीन लघुपट

सध्या शॉर्ट्स फिल्म्सना बरंच महत्व आलंय. कमी वेळात महत्वाचा आशय प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्याचं अवघड काम यातून होत असते. आता तर लघुपटांना सर्वच पुरस्कार सोहळ्यांतून मानसन्मान दिला जातो. मराठीतही लघुपटांतून नामांकित लेखक, दिग्दर्शक, कलाकार हजेरी लावताना दिसतात. असाच एक नवीन लघुपट आलाय ज्याचं नाव आहे ‘कम्फर्ट नात्यांचा' ज्यातून प्रथमच यशोमन, मयूरी, सुयश, निवेदीता आणि भरतचं अफलातून समीकरण पहायला मिळणार आहे.

काही लघुपट अतिशय कमी वेळात पूर्ण लांबीच्या चित्रपटांपेक्षाही प्रभावी संदेश देत मनामनांत घर करतात. नात्यांच्या धाग्यांची वीण जितकी घट्ट असते, तितकं ते नातं अधिक दृढ आणि विश्वासपात्र ठरतं. गुढीपाडव्यानिमित्त अशाच नाजूक नात्यांच्या प्रेमाची कथा कॉटनकिंगच्या सहाय्यानं प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. अद्भुत क्रिएटीव्हजच्या मोनिका धारणकर लिखित आणि वैभव पंडित दिग्दर्शित ''कम्फर्ट नात्यांचा" कॅाटन आणि नात्यांची सांगड घालत एक महत्त्वपूर्ण मेसेज समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आहे. कॉटन किंगचे कौशिक मराठे म्हणतात की कपड्या प्रमाणे जर नाती ही जरा सुटसुटीत राहिली तर कुटुंब सदृढ राहील.

कम्फर्ट नात्यांचा नवीन लघुपट
कम्फर्ट नात्यांचा नवीन लघुपट
कुटुंबातील नातेसंबंधात बाप लेकीच्या नात्याची बात काही औरच असते. अशी बाप लेकीची कथा 'कम्फर्ट नात्यांचा'' या लघुपटात सांगण्यात आली आहे. मुलीसोबत आलेलं नवं नातं स्वीकार करताना वडीलांच्या मनातील भाव अत्यंत सुरेखपणे सादर करण्यात आले आहेत. दोन पिढ्यांमधला फरक विनोदी ढंगात मांडून इतर नात्यांचे पदर अलगद उलगडले आहेत. या लघुपटाच्या निमित्तानं भरत जाधव आणि निवेदिता सराफ ही जोडी एकत्र आली आहे. इतकंच नाही तर सगळ्यांची लाडकी मयूरी देशमुख ही पण या लघुपटाचे आकर्षण आहे. भरत जाधव यांनी धमाल केली आहे तर निवेदीता यांनी सहज अभिनयाने आपली छाप सोडली आहे.या लघुपटात भरत जाधव, निवेदिता सराफ, यशोमन आपटे, मयूरी देशमुख, सुयश टीळक हे मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचे कलाकार आहेत. प्रत्येकाने आपापली भूमिका चोख बजावली आहे. ‘मद्रास कॅफे', 'लुका छिपी' या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी करणारे मिलिंद जोग या लघुपटाचे डिओपी आहेत.हेही वाचा - Rrr In Ap : आंध्रातील प्रेक्षकांचा नादखुळा : सिनेमा थिएटरमध्ये लोखंडी खिळे आणि काटेरी कुंपण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.