मुंबई- ‘छोटी सरदारनी’ या मालिकेमध्ये प्रेक्षकांना बरीच नाट्यमय वळणं अनुभवली आहेत. आता तर ही मालिका ५ वर्षांचा ‘लीप’ घेत आहे त्यामुळे प्रेक्षकांची उत्कंठा वाढीस लागली आहे. या नव्या घडामोडींमध्ये एका बालकलाकाराचीसुद्धा एन्ट्री होतेय. ‘छोटीशी सरदारनी’ सेहेर उर्फ केविना टाक सध्या नवीन भागांच्या चित्रीकरणासाठी संपूर्ण युनिटसह काश्मीरमध्ये आहे. भारताचे नंदनवन म्हटल्या जाणाऱ्या काश्मीरमध्ये सध्या बर्फाची चादर असून केविना शुटिंगसोबत मौजमस्तीपण करताना दिसत आहे. तिची तर एका छोट्याश्या वारुकसोबत गट्टीही जमली आहे.
तसे बघायला गेले तर लहान मुले व प्राण्यांमध्ये मैत्री लगेच होते. आपल्या पालकांसोबत आजूबाजूच्या परिसरात फिरायला गेल्यावर केवीनाने छोट्या टट्टूवरून रपेट केली. तिला रपेट तर आवडलीच परंतु छोटासा वारुक पण तिला आवडला. तिला या ‘पोनी’वर बसणे खूप रोमांचक वाटले आणि तिने मनमुराद रपेटीचा आनंद लुटला. तिचे काम संपल्यावर ती रोज त्याच पोनीवरून फिरून यायची व त्याचे लाडही करायची.
यावर बोलताना केविना म्हणाली, "मला प्राणी खूप आवडतात. ते माझे खूप चांगले मित्र आहेत, आणि मला ते खूप गोड वाटतात. आता सध्या मी काश्मीर मध्ये माझ्या शोच्या चित्रीकरणासाठी गेले असताना जेव्हा मला रिकामा वेळ होता त्यावेळी माझ्या आईवडिलांनी मला नवीन जागा दाखवायला नेले होते. त्याच वेळी मी एका पोनीला पाहिले आणि मी स्वतःला थांबवू शकले नाही आणि रपेटी साठी गेले आणि मला त्यात खूप आनंद मिळाला. मी मुंबईला आल्यावर मला पोनीची खूप आठवण येईल कारण चित्रीकरणानंतर प्रत्येक दिवशी मी माझ्या आईवडिलांसह त्याच्याशी खेळत असे.
५ वर्षांच्या झेपेनंतर, छोटी सरदारनीची कथा एक नवीन कलाटणी घेणार आहे. ज्यात मेहेरवर खोटा आरोप केला जातो आणि तिने न केलेल्या गुन्ह्यासाठी तिला तुरूंगात टाकले जाते. ती सरबजित आणि त्यांची मुले परम व करण सोबतची सगळी नाती तोडून टाकते. परंतु, तुरूंगात असताना तिला कळते की ती गरोदर आहे आणि ती सेहेर नावाच्या मुलीला जन्म देते. यापुढील कथेमध्ये मेहेर व सरबजीत यांचे जीवन आणि त्यांची मुलगी सेहेर यांचे नवीन प्रकरण दाखवले जाणार आहे.
‘छोटी सरदारनी’ केविना टाकची जमली छोट्या वारुक सोबत गट्टी! - choti sardarni serial latest news
छोटी सरदारनीची कथा ५ वर्षांच्या झेपेनंतर एक नवीन कलाटणी घेणार आहे. ज्यात मेहेरवर खोटा आरोप केला जातो आणि तिने न केलेल्या गुन्ह्यासाठी तिला तुरूंगात टाकले जाते. ती सरबजित आणि त्यांची मुले परम व करण सोबतची सगळी नाती तोडून टाकते.
![‘छोटी सरदारनी’ केविना टाकची जमली छोट्या वारुक सोबत गट्टी! केविना टाक](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-10507369-234-10507369-1612506310490.jpg?imwidth=3840)