ETV Bharat / sitara

'चला हवा येऊ द्या' कार्यक्रम वादात : 'हवा डोक्यात घुसली' - संभाजीराजे छत्रपती - 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रम वादात

'चला हवा येऊ द्या' मध्ये राजर्षी शाहू महाराज आणि सयाजीराव गायकवाड यांच्या प्रतिमेचा चुकीच्या पद्धतीने वापर केल्यामुळे खासदार संभाजीराजे छत्रपती चांगलेच संतापले आहेत. त्यांनी याबाबत ट्विटरच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त केला आहे.

Chala Hawa yeu dya programme in controversy
'चला हवा येऊ द्या' कार्यक्रम वादात : 'हवा डोक्यात घुसली' - संभाजीराजे छत्रपती
author img

By

Published : Mar 14, 2020, 2:59 AM IST

Updated : Mar 14, 2020, 3:12 AM IST

कोल्हापूर - महाराष्ट्रातील लोकप्रिय असलेली मालिका 'चला हवा येऊ द्या' मध्ये राजर्षी शाहू महाराज आणि सयाजीराव गायकवाड यांच्या प्रतिमेचा चुकीच्या पद्धतीने वापर केल्यामुळे खासदार संभाजीराजे छत्रपती चांगलेच संतापले आहेत. त्यांनी याबाबत ट्विटरच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त केला आहे. तसेच, झी वाहिनी आणि मुख्य कलाकार निलेश साबळे यांनी याबाबत जाहीर माफी मागावी, अन्यथा कायदेशीर कारवाई करु, असा इशारा त्यांनी दिला आहे.

Chala Hawa yeu dya programme in controversy
संभाजीराजे छत्रपती यांचे ट्विट

संभाजीराजे यांनी ट्विट मध्ये म्हंटले आहे. की 'लोकप्रियतेची हवा डोक्यात घुसली, की माणूस विक्षिप्त वागायला सुरू करतो. 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमात राजर्षी शाहू महाराज आणि सयाजीराव गायकवाड यांच्या प्रतिमेचा चुकीच्या पद्धतीने वापर केला गेला आहे. हे आक्षेपार्ह तर आहेच, परंतु निषेधार्ह सुद्धा आहे. आमचे घराणे कलेचे आश्रयदाते आहे. स्वतः शाहू महाराजांनी कोल्हापूरला कलानगरीमध्ये रूपांतरित केले. सयाजीराव गायकवाडांचे योगदान ही कमी नाही. कलेसाठी स्वातंत्र्याची व पोषक वातावरणाची गरज असते. याचा अर्थ असा नाही की काहीही करावं. आम्हा सर्व इतिहासप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. निलेश साबळे तसेच झी वाहिनी ने गैरकृत्याची जबाबदारी घेऊन जाहीर माफी मागावी. अन्यथा वाहिनी व दिग्दर्शक यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी ट्विट मध्ये म्हटले आहे.

  • लोकप्रियतेची हवा डोक्यात घुसली, की माणूस विक्षिप्त वागायला सुरू करतो. 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमात राजर्षी शाहू महाराज आणि सयाजीराव गायकवाड यांच्या प्रतिमेचा चुकीच्या पद्ध्तीने वापर केला गेला आहे. हे आक्षेपार्ह तर आहेच, परंतु निषेधार्ह सुद्धा आहे.

    — Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) March 13, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

त्यांच्या या ट्विटनंतर झी वाहिनी आणि निलेश साबळे याबाबत काय बोलतात, हे पाहावे लागणार आहे.

Last Updated : Mar 14, 2020, 3:12 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.