स्टार प्रवाहवरील ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळतोय. मालिकेतील पात्रे लोकप्रिय झालं असून कानेटकर आणि वर्तक कुटुंब प्रेक्षकांच्या कुटुंबाचा एक भाग झालंय. ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेत ज्ञानदा रामतीर्थकर अपूर्वाची भूमिका साकारत आहे आणि शशांकच्या भूमिकेत आहे चेतन वडनेरे. मॉडर्न विचारांची आणि प्रचंड उत्साही, अतिशय लाडावलेली अशी अपूर्वा ही मुलगी आहे. आता मालिकेत लग्नाची धामधूम सुरु होणार असून अपूर्वा-शशांकच्या हळदीसाठी खास पाहुणे पोहोचणार आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
जिलेबीसारखा गोडवा जपणारा शशांक आणि लवंगी मिरची प्रमाणे ठसक्याला आणि चवीला कमी नसणारी अपूर्वा. दोघांचे स्वभाव परस्परविरोधी असले तरी दोघांना एकत्र जोडून ठेवणारा दुवा म्हणजे कुटुंबावरचं प्रेम. याच कुटुंबावरच्या प्रेमाने दोघांना एकत्र यायला भाग पाडलं आहे. लग्न म्हणजे दोन मनांचं नाही तर दोन कुटुंबांचं मिलन असतं. एकत्र कुटुंब पद्धतीचं महत्व अधोरेखित करणाऱ्या ठिपक्यांची रांगोळी या मालिकेतला हा विवाहसोहळा फक्त वर्तक आणि कानेटकर परिवारच नाही तर संपूर्ण प्रवाह परिवार साजरा करणारा आहे.
![ठिपक्यांची रांगोळी मालिकेतील विवाहसोहळा](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-ent-thipkyanchi-rangoli-celebrities-at-wedding-mhc10001_18012022004415_1801f_1642446855_14.jpeg)
आता स्टार प्रवाहवरील ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेत सुरु आहे शशांक आणि अपूर्वाच्या लग्नाची धामधूम. कानेटकर आणि वर्तक कुटुंबाने लग्नाची जय्यत तयारी केली असून लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झालीय. रंग माझा वेगळा मालिकेतील दीपाच्या हजेरीत केळवण पार पडल्यानंतर आता हळदीसाठीही खास पाहुणे हजेरी लावणार आहेत. शशांक अपूर्वाच्या हळदीला वैशाली सामंत, आदर्श शिंदे आणि फुलाला सुगंध मातीचा मालिकेतील कीर्ती यांची खास उपस्थिती असणार आहे. हळद म्हटलं की नाचगाणं हे ओघाने आलंच. वैशाली सामंत आणि आदर्श शिंदे यांच्या सुपरहिट गाण्याने हळदीच्या कार्यक्रमाची रंगत आणखी वाढणार आहे.
![ठिपक्यांची रांगोळी मालिकेतील विवाहसोहळा](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-ent-thipkyanchi-rangoli-celebrities-at-wedding-mhc10001_18012022004415_1801f_1642446855_304.jpeg)
ह्ही वाचा - रोहित शेट्टी आणि फरहान अख़्तर यांच्या ‘मिशन फ्रंटलाईन’मधील खडतर प्रशिक्षणाची झलक!