ETV Bharat / sitara

घुंगरांचा छनछनाट थांबला..लावणी कलावंतांवर पोटाला चिमटा काढून जगण्याची वेळ!!

author img

By

Published : Apr 15, 2021, 1:49 PM IST

कोरोनामुळे तमाशा कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. गावोगावच्या जत्रा बंद असल्यामुळे पोटाला चिमटा काढून जगण्याचा प्रसंग त्यांच्यावर आलाय. सध्या सुरू असलेल्या ब्रेक द चेनमध्ये अलिकडेच सुरू झालेली कला केंद्रेही पुन्हा बंद झाली आहेत. त्यामुळे यावर उपजिवीका असलेल्यांनी जगायचे कसे हा प्रश्न तयार झालाय.

-crisis-to-survive-on-folk-artists
तमाशा कलावंतांवर उपासमारीची वेळ

दौंड - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मार्च २०२० पासून कोरोना विषाणूवर नियंत्रण आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. मात्र एवढ्या लवकर थांबेल तो कोरोना कसला. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वात मोठा फटका बसला तो महाराष्ट्राची लोककला असलेल्या लावणी कलावंतांना व तमाशात काम करणाऱ्या कलावंतांना. सध्या तमाशा व कला केंद्र बंद असल्यामुळे 'पोटासाठी नाचते मी पर्वा कुणाची' असं म्हणणाऱ्या लोक कलावंतांवर आता 'पोटाला चिमटा' काढून जगण्याची वेळ आली आहे.

तमाशा कलावंतांवर उपासमारीची वेळ

महाराष्ट्राची लोककला म्हणून लोकमान्य पावलेल्या लोकनाट्य अर्थात तमाशाची अत्यंत बिकट अवस्था आहे. करोनाच्या प्रादुर्भावामुळे तमाशा फड मालकांचा यात्रांचा हंगाम पुर्णत: वाया गेला. अशा परिस्थितीत लोकप्रबोधनाचे कार्य करत असलेल्या राज्यातील हजारो तमाशा कलावंतांवर उपासमारीची वेळ आली. आता अचानक ३० एप्रिलपर्यंत कला केंद्र बंद करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्यामुळे महिनाभर करायचे काय? पैसे न आल्यास जगायचे कसे? खायचे काय? असे एक ना अनेक प्रश्न कलावंतांसमोर आहेत. त्यामुळे कला केंद्रमालक देखील चिंतेत आहेत.

यात्रा बंद झाल्या आणि दुष्टचक्र वाढलं

यात्रा जत्रा म्हटलं की, वर्षभर गावाबाहेर असलेले चाकरमानी गावांमध्ये येतात, सासुरवाशीना आपल्या माहेरची ओढ लागलेली असते. गावामध्ये ग्रामदेवतेचा छबीना, मिरवणूक, लहान मुलांसाठी खेळण्याची दुकाने, गगनचुंबी पाळणे, विविध धाडसी खेळ, कुस्तीचा आखाडा याच बरोबर मनोरंजनासाठी गावोगावी तमाशाचा कार्यक्रम ठेवला जातो. एका तमाशा फडामध्ये सुमारे १०० पेक्षा जास्त कलावंत आपली वेगवेगळी भूमिका बजावत असतात. वर्षातील चार महिने यात्रा जत्रांमध्ये खेळ करून आपला वर्षभराचा उदरनिर्वाह केला जातो.

लावणी कला टिकवण्याचे मोठे आव्हान

मात्र गेल्यावर्षी ऐन यात्रांच्या सीजनमध्ये कोरोना महामारी ने थैमान घातले. शासनाने लॉकडाऊन केले. गावोगावच्या यात्रा जत्रा बंद करण्यात आल्या. लोक मनोरंजनासाठी असलेली कला केंद्र देखील बंद झाली. सद्या जगाने आधुनिकीकरणाकडे वाटचाल सुरू केली. अँड्रॉइड मोबाइल, टीव्ही,संगणक अशी वेगवेगळी मनोरंजनाची साधने निर्माण झाली. यामुळे लावणीकडे पहाण्याचा लोकांचा कलही बदलत गेला. आधुनिकतेची कास धरलेल्या जमान्यात तमाशा व कला केंद्रातून पारंपारिक लावणी लोककला जोपासण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

लोककलावंतावर आर्थिक संकटाचे सावट

२०२० या वर्षात राज्यभर बोटावर मोजण्या इतकेच खेळ तमाशाचे झाले. अवघे दोन-तीन महिने कला केंद्र सुरू झाली. मात्र हा घुंगरांचा छनछनाट जास्त काळ टिकला नाही. २०२१ मध्ये पुन्हा कोरोनाने डोके वर काढले. राज्याची स्थिती पुन्हा लॉक डाऊन करण्यासारखी झाली आहे. त्यामुळे या लोककलावंतावर उपासमारीची वेळ आली आहे.या कलावंतांची दखल सरकार दरबारी देखील कोणी घेताना दिसत नाही.या कलेवर आपली उपजीविका चालविणारे नर्तकी, नाचा, ढोलकीवादक, गायक आदींवर सध्या आर्थिक संकटाचे सावट आहे.

लावणी कलावंतांसाठी विशेष पॅकेज जाहीर करावे

लावणी स्पर्धेसाठी चालते, ही महाराष्ट्राची लोककला आहे, तर तमाशा हा लोकप्रबोधनाचा प्रमुख आणि प्रभावी आधार आहे. राज्य शासन लोक कलावंतांसाठी केवळ घोषणा करत आहे. त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. कोरोनामुळे अनेक कलावंतांवर उपासमारीची वेळ आली असून रोजंदारीवर काम काही कलावंत करत आहेत. शासनाने याचा विचार करून लावणी कलावंतांसाठी विशेष पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य तमाशा थिएटर मालक संघटनेचे अध्यक्ष डॉ.अशोक जाधव यांनी केली आहे.

कला केंद्र सुरू ठेवण्याची मागणी

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे हे आम्ही समजू शकतो, आमचं ही कुटुंब आहे, लावणी हेच आमचं उपजीविकेचे साधन आहे. कला केंद्र बंद झाल्यामुळे सर्वच कलावंत आर्थिक अडचणीत सापडले आहेत. मालक देखील किती दिवस सहकार्य करणार. त्यामुळे शासनाने आमची दखल घेऊन सर्व शासकीय नियमांचे पालन करून सायंकाळी सहा पर्यंत तरी कला केंद्र सुरू ठेवण्याचा निर्णय घ्यावा,असे मत लावणी कलावंत प्रिया नगरकर यांनी व्यक्त केलंय.

हेही वाचा - टकाटक’ च्या सिक्वेलच्या शूटिंगला गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर झाली सुरूवात!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.