भरत सुनंदा लिखित आणि दिग्दर्शित 'बॉम्बे डे' या वेब सिरिज चा मुहूर्त सोहळा नुकताच नितिन चंद्रकांत देसाई यांच्या 'एन. डी. फिल्म स्टुडिओ' येथे संपन्न झाला. नितीन चंद्रकांत देसाई हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून त्यांच्या हस्ते चित्रीकरणाचा शुभारंभ करण्यात आला.1 फाईव्हफिल्म्स प्रॉडक्शन्स निर्मित 'बॉम्बे डे' ही गुन्हेगारीवर आधारित वेब सिरीज सत्य घटनेपासून प्रेरित आहे.
![bombay-day-web-series-shooting](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-04-bombay-day-webserise-shoot-mhc10076_10062020162042_1006f_1591786242_272.jpg)
ही गोष्ट आहे मुंबईमधल्या एका मोठ्या अंडरवर्ल्ड डॉनची, ज्याचा एन्काऊंटर विजय साळसकर यांनी केला होता. त्या काळात विजय साळसकर यांनी बऱ्याच कुख्यात गुंडाचे एन्काऊंटर केले होते, पण हा एन्काऊंटर मुंबई मधला सर्वात मोठा एन्काऊंटर ठरला. त्यांना कोणी मदत केली? नक्की कोण कोण यामध्ये सहभागी होते? यात कोणत्या राजकारण्याचा संबंध होता का? यांसारख्या अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला या वेब सिरिजच्या माध्यमातून मिळणार आहेत.या वेब सिरिज मधील सर्व कलाकारांची नावे अद्याप समोर आलेली नाहीत. पण या वेब सीरिजमधून अनुपम खेर, जूही चावला, किशोरी शहाणे, अनिकेत विश्वासराव, इक्बाल खान, शक्ती कपूर, आणि संदीपा धार या प्रसिद्ध व्यक्तिरेखां आपल्या भेटीला येणार आहेत.
![bombay-day-web-series-shooting](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-04-bombay-day-webserise-shoot-mhc10076_10062020162042_1006f_1591786242_400.jpg)
प्रसाद पांचाळ हे कार्यकारी निर्माते आहेत तर धरम सावलानी हे लाईन प्रोड्यूसर आहेत आणि चारू खाबडे या मार्केटिंग आणि इंटिग्रेशनच्या प्रमुख आहेत. 'बॉम्बे डे' ही मल्टीस्टारर वेब सीरिज तुम्हाला गुन्हेगारी कथानक आणि अॅक्शन-पॅक शॉट्सच्या सीन्समुळे कथेशी बांधून ठेवेल यात शंका नाही आणि ही वेब सिरीज नोव्हेंबरमध्ये ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.मुंबईत चित्रीकरण करण्याची परवानगी मिळवण्यात अजूनही काही अडचणी कायम असल्याने निर्मात्यांनी कर्जत येथे असलेल्या एन डी स्टुडिओत सोशल डिस्ट्सनिंगचे सर्व नियम पाळून चित्रीकरणाला सुरुवात केली आहे.