ETV Bharat / sitara

Bigg Boss 15: महिला स्पर्धकांचा अनादर करणाऱ्यांची सलमान खानने घेतली शाळा - सलमान खानने घेतली पुरुष स्पर्धकांची शाळा

बिग बॉस 15 च्या वीकेंड का वार एपिसोडमध्ये सलमान खानने घरातील स्पर्धकांची चांगलीच शाळा घेतली. घरामध्ये वाद घालणाऱ्या करण कुंद्रा, राजीव अदातिया, उमर रियाझ आणि इतरांना घरातील महिलांचा आदर करत नसल्याबद्दल सलमानने भरपूर झापले.

सलमान खानने घेतली पुरुष स्पर्धकांची शाळा

author img

By

Published : Dec 11, 2021, 5:29 PM IST

मुंबई (महाराष्ट्र): बिग बॉस 15 च्या वीकेंड का वार एपिसोडमध्ये सलमान खानने घरातील स्पर्धकांची चांगलीच शाळा घेतली. घरामध्ये वाद घालणाऱ्या करण कुंद्रा, राजीव अदातिया, उमर रियाझ आणि इतरांना घरातील महिलांचा आदर करत नसल्याबद्दल सलमानने भरपूर झापले.

सलमानने पुरुष स्पर्धकांना फटकारले कारण ते नातेसंबंधांमधील परस्पर विश्वास तोडताना आणि त्यांचे जवळचे संबंध बाजूला ठेवताना दिसतात.

बिग बॉस 15 च्या नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा विशाल कोटियनची चर्चा करताना एकमेकांशी भांडताना दिसले. तेजस्वीला राजीव अडातिया आणि करण यांनी दोष दिला की, जर तिला विशालच्या खेळातील नियोजनाची माहिती होती, तर तिने त्याबद्दल कधीच खुलासा का केला नाही?

पण तेजस्वीने तिची भूमिका घेतली आणि करणला तिचा मुद्दा समजून सांगण्याचा प्रयत्न केला. करणने त्यांचा संयम सोडला आणि तिच्यावर भडकला होता. तेजस्वीच्या हे मनाला खूप लागले व पोहण्याच्या तलावात उडी घेतली. तिच्या वेदना आणि मनाच्या अस्वस्थतेमुळे ती रात्रभर पोहताना दिसली.

ताज्या प्रोमोमध्ये राजीव आणि शमिता समोरासमोर येतात आणि वाद करताना दिसतात. तर उमर आणि रश्मी देखील मतभेद आणि वादात सापडले आहेत. सलमान राजीव आणि उमर यांच्यासोबत करण कुंद्रा यांच्या वागणुकीबद्दल विचारपूस करताना दिसत आहेत.

हेही वाचा - पाहा, मलायका अरोरा आणि अरबाज खान मुलगा अरहानच्या स्वागतासाठी आले एकत्र

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.