ETV Bharat / sitara

कार्तिकबद्दल अनन्या पांडे म्हणते... - soty news

अनन्याने 'पती, पत्नी और वो'च्या शूटिंगचे लखनौ येथील पहिले शेड्यूल पूर्ण केले आहे. अलिकडेच तिने मुबंईच्या 'लॅक्मे फॅशन वीक'च्या कार्यक्रमात हजेरी लावली होती.

कार्तिकबद्दल अनन्या पांडे म्हणते...
author img

By

Published : Aug 12, 2019, 8:25 AM IST

मुंबई - अभिनेत्री अनन्या पांडे हिने 'स्टुडंट ऑफ द ईयर २' चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण केले आहे. आता ती कार्तिक आर्यनसोबत 'पती,पत्नी और वो'च्या रिमेकमध्ये दिसणार आहे. खरंतर कार्तिक आणि अनन्या खूप दिवसांपासून एकमेकांचे चांगले मित्र आहेत. मध्यंतरी कार्तिक अनन्याला डेट करतोय, अशाही चर्चा रंगल्या होत्या. त्यामुळे आगामी चित्रपटात त्यांची केमेस्ट्री पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

अनन्याने 'पती, पत्नी और वो'च्या शूटिंगचे लखनौ येथील पहिले शेड्यूल पूर्ण केले आहे. अलिकडेच तिने मुबंईच्या 'लॅक्मे फॅशन वीक'च्या कार्यक्रमात हजेरी लावली होती. 'लॅक्मे फॅशन वीक'च्या २० वर्षपूर्ती निमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दरम्यान अनन्याने माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी तिला सेटवरचा अनुभव विचारण्यात आला. तसंच कार्तिकसोबत पहिल्यांदाच भूमिका साकारण्याचाही अनुभव कसा होता, असं विचारण्यात आलं. याबाबत बोलताना तिने कार्तिकचे भरभरुन कौतुक केलं.

ती म्हणाली, की 'सेटवरचे वातावरण अतिशय मनमोकळं होतं. कार्तिकसोबत भूमिका साकारताना मला फार मजा आली. कार्तिक खूप विनोदी स्वभावाचा आहे. सेटवरही त्याची धमाल सुरू असते. सर्वांना तो नेहमी हसवत राहतो'.

चित्रपटाबद्दल बोलताना ती म्हणाली, की 'हा चित्रपट एक मनोरंजक चित्रपट आहे. प्रेक्षकांना खूप धमाल येईल. तर, लॅक्मे फॅशनबाबतही ती म्हणाली की, 'हा माझ्यासाठी पहिलाच अनुभव आहे. लॅक्मे फॅशन विकचा मी देखील एक भाग होणार आहे. त्यासाठी मी फार उत्सुक आहे'.

कार्तिक आणि अनन्यासोबतच अभिनेत्री भूमी पेडणेकर देखील 'पती, पत्नी और वो'च्या रिमेकमध्ये झळकणार आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.