ETV Bharat / sitara

‘सूर्यवंशी’ च्या टीमची ‘चला हवा येऊ द्या’ च्या मंचावर धमाल मस्ती! - Rohit Shetty

बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमार, जॅकी श्रॉफ आणि रोहित शेट्टी हे ‘चला हवा येऊ द्या’ मध्ये धमाल मस्ती करताना दिसले. खिलाडी अक्षय कुमार याने फक्त या मंचावर हजेरीच नाही लावली तर त्याच्या ढासू स्टाईलमध्ये एक जबरदस्त परफॉर्मन्स सुद्धा दिला.

Akshay Kumar, Rohit Shetty & Jackie Shroff promote Sooryavanshi on the sets of Chala Hawa Yeu Dya
‘सूर्यवंशी’ च्या टीमची ‘चला हवा येऊ द्या’ च्या मंचावर धमाल मस्ती!
author img

By

Published : Nov 3, 2021, 8:12 AM IST

मुंबई - बहुचर्चित बॉलिवूड सिनेमा, सूर्यवंशी, दिवाळीत प्रदर्शित होत आहे. त्याचे प्रोमोशन करण्यासाठी सिनेमाची पूर्ण टीमने ‘चला हवा येऊ द्या’ च्या मंचावर हजेरी लावली. झी मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम चला हवा येऊ द्या आणि त्यातील विनोदवीर वर्षानुवर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत आहेत. केवळ महाराष्ट्रातच नाही, तर जगाच्या कानाकोपऱ्यातील प्रेक्षकांकडून या कार्यक्रमाला पसंती मिळत आहे. या कार्यक्रमाची लोकप्रियता इतकी आहे की मराठी सोबत हिंदी कलाकार सुद्धा ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर येत असतात. अशातच बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमार, जॅकी श्रॉफ आणि रोहित शेट्टी हे ‘चला हवा येऊ द्या’ मध्ये धमाल मस्ती करताना दिसले.

Akshay Kumar, Rohit Shetty & Jackie Shroff promote Sooryavanshi on the sets of Chala Hawa Yeu Dya
चला हवा येऊ द्या च्या मंचावर अक्षय कुमारची धमाल
खिलाडी अक्षय कुमार याने फक्त या मंचावर हजेरीच नाही लावली तर त्याच्या ढासू स्टाईलमध्ये एक जबरदस्त परफॉर्मन्स सुद्धा दिला. त्याचा हा परफॉर्मन्स इतका अफलातून होता की टाळ्या आणि शिट्या थांबल्याच नाहीत. हे सर्व कलाकार त्यांचा आगामी सिनेमा सूर्यवंशीच्या प्रमोशनच्या निमित्ताने चला हवा येऊ द्याच्या मंचावर आले होते. तसेच डॉक्टर निलेश साबळेने सोशल मीडियावर अक्षय कुमारसोबतचा एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये दोघेही खूप खुश दिसत आहे. हा फोटो शेअर करून त्याने लिहिले आहे की, ‘आ रही है पुलिस, सुपरस्टार खिलाडी येणार, आपल्या मंचावर दंगा होणार, दिवाळीचा सुपरहिट धमाका.’सूर्यवंशीची अॅक्शन आणि ‘चला हवा येऊ द्या’ ची कॉमेडी अॅक्शनच्या माध्यमाने पहिल्यांदाच अक्षयकुमार यांचा मराठमोळा अंदाज पाहायला मिळाला. सोशल मीडियावर या विशेष एपिसोडमधील एक सीन देखील शेअर केला होता. ज्याला खूप प्रतिसाद मिळाला होता. ‘चला हवा येऊ द्या’ च्या मंचावर अक्षय कुमारने धमाल मस्ती केली.

हेही वाचा - 3 नोव्हेंबर राशीभविष्य : 'या' राशीवाल्यांना आज व्यवहारात आपण अडचणीत येऊ शकतात; जाणून घ्या आजचे राशीभविष्य

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.