मुंबई - सिनेमा हा समाजाचा आरसा असतो असे म्हटले जाते. अनेक सामाजिक विषय मोठ्या पड्यावर वास्तववादी साकारले जातात. यातून समाजातील भीषण वास्तव समोर येत असतं. अलिकडेच 'छपाक' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आणि दीपिका पदुकोणच्या भूमिकेचे कौतुक झालं. अॅसिड हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मुलीची ही सत्यकथा आहे. खरंतर यापूर्वीही असे विषय चित्रपटातून हाताळण्यात आले. मात्र, कुणाला प्रसिद्धी मिळाली तर कोणी यापासून दूर राहिले.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
-
Team #chhapaak @deepikapadukone BRAVO! ❤️
— Parvathy Thiruvothu (@parvatweets) December 11, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Chhapaak | Official Trailer | Deepika Padukone | Vikrant Massey | Meghna... https://t.co/dajvZ7Qi12 via @YouTube
">Team #chhapaak @deepikapadukone BRAVO! ❤️
— Parvathy Thiruvothu (@parvatweets) December 11, 2019
Chhapaak | Official Trailer | Deepika Padukone | Vikrant Massey | Meghna... https://t.co/dajvZ7Qi12 via @YouTubeTeam #chhapaak @deepikapadukone BRAVO! ❤️
— Parvathy Thiruvothu (@parvatweets) December 11, 2019
Chhapaak | Official Trailer | Deepika Padukone | Vikrant Massey | Meghna... https://t.co/dajvZ7Qi12 via @YouTube
-
Thank you!!! ❤️ https://t.co/U6ylvPWsjT
— Parvathy Thiruvothu (@parvatweets) December 11, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Thank you!!! ❤️ https://t.co/U6ylvPWsjT
— Parvathy Thiruvothu (@parvatweets) December 11, 2019Thank you!!! ❤️ https://t.co/U6ylvPWsjT
— Parvathy Thiruvothu (@parvatweets) December 11, 2019
'छपाक'च्या पूर्वी अशा विषयाचे चित्रपट रिलीज झाले होते. 'उयारे' या दाक्षिणात्य चित्रपटात अभिनेत्री पार्वती थिरुवोथु हिने अॅसिड हल्ल्यात जखमी झालेल्या मुलीची भूमिका साकारली होती. 'छपाक'चा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर आता पार्वती थिरुवोथु हिच्या चित्रपटाची चर्चा रंगू लागली आहे.
सोशल मीडियावर पार्वती थिरुवोथु या अभिनेत्रीचे कौतुक सुरू झालंय. ७ एप्रिल १९८८ मध्ये जन्मलेल्या पार्वतीने मल्याळम, तेलुगु आणि कन्नड चित्रपटामध्ये काम केलंय. तिने आपल्या करियरची सुरुवात २००६ मध्ये 'आउट ऑफ स्लेबस' या मल्याळम चित्रपटातून केली होती.
केरळमध्ये जन्मलेल्या पार्वतीचे आई वडिल वकिल आहेत. थिरुवनंतपूरममध्ये तिचे शालेय शिक्षण झाले. ती एक व्यावसायिक भरतनाट्यम डान्सर आहे.
पार्वतीने 'उयारे' या चित्रपटात अॅसिड हल्ला झालेल्या पीडितेची भूमिका साकारली. एक हुशार विद्यार्थी असलेल्या आणि पायलट बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या पीडितेची ही व्यक्तीरेखा पार्वतीने खूप ताकतीने निभावली. 'छपाक'च्या निमित्ताने तिची तुलना आता दीपिकाशी होऊ लागली आहे.