ETV Bharat / sitara

'आठशे खिडक्या नऊशे दारं'..!, लॉकडाऊनदरम्यान मालिकेचं घरातच शूट

'आठशे खिडक्या नऊशे दार' ही एका वात्रट सोसायटीत घडणारी गोष्ट आहे. मालिकेची कथा नक्की काय आहे, हे प्रोमो पाहिल्यावर आपल्या लक्षात आलंच असेल. मंगेश कदम, लीना भागवत, सखी गोखले, सुव्रत जोशी, समीर चौगुले, पंढरीनाथ कांबळे, विशाखा सुभेदार, नम्रता आवटे असे 16 कलाकार या मालिकेत आपल्याला दिसणार आहेत.

Aathshe khidkya naushe daar marathi serial
'आठशे खिडक्या नऊशे दारं'
author img

By

Published : May 17, 2020, 9:19 AM IST

मुंबई - 'आठशे खिडक्या नऊशे दारं' ही मालिका येत्या 18 मे पासून सोमवारी आणि मंगळवारी 'सोनी मराठी' वाहिनीवर सुरू होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचे सगळे नियम पाळून घरातच याच शूट होत असल्याने ही मालिका सध्या विशेष चर्चेत आहे. नुकतीच या मालिकेतील कलाकारांची पत्रकार परिषददेखील झूम अॅपद्वारे पार पडली.

Aathshe khidkya naushe daar marathi serial
कलाकारांची झूम अॅपद्वारे पत्रकार परिषद

'आठशे खिडक्या नऊशे दार' ही एका वात्रट सोसायटीत घडणारी गोष्ट आहे. मालिकेची कथा नक्की काय आहे हे प्रोमो पाहिल्यावर आपल्या लक्षात आलंच असेल. मंगेश कदम, लीना भागवत, सखी गोखले, सुव्रत जोशी, समीर चौगुले, पंढरीनाथ कांबळे, विशाखा सुभेदार, नम्रता आवटे असे 16 कलाकार या मालिकेत आपल्याला दिसणार आहेत. विशेष म्हणजे सध्या कॅमेरामन, मेकअपमन, स्पॉटबॉय, लाईटमन असे कुणीच सोबत नसल्याने कलाकार स्वतःचे सीन्स स्वतःच मोबाईलवरून शूट करून पाठवत आहेत.

सखी आणि सुव्रत

कलाकारांवर शूट करणे, पाठवणे आणि अभिनय करणे अशी तिहेरी जबाबदारी आहे. आपली घरची कामं वेळेत करून प्रसंगी घरातील सदस्यांना कॅमेरामन बनवून तर कधी एखादा साधा ट्रायपॉड तर कधी घरातील चिमट्याचा सेल्फी स्टिक म्हणून वापर करून शूट करणं सुरू आहे. कधी घरातील मंडळींचे मूड जपत तर कधी शेजाऱ्याचा कुत्रा, घरातील कुकरची शिट्टी, चिमण्या कावळ्याचे आवाज, सोसायटीत भाजी विक्रीसाठी येणाऱ्यांचा आवाज अशा बाहेरच्या आक्रमणांचा सामना करत कलाकारांना शूटींग करावं लागत आहे.

या मालिकेची मुळ कल्पना श्रीरंग गोडबोले यांची आहे. तर सोनी मराठीचे अजय भालवणकर यांच्या साथीने त्यांनी ती प्रत्यक्षात आणली आहे. प्रत्येक कलाकाराचा मोबाईल, त्यातील सेटींग वेगवेगळे असल्याने ते बदलण्यासाठी एक खास टीम तैनात करण्यात आली आहे. अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करत पण मजा घेत शूटिंग सुरू आहे. याशिवाय दिग्दर्शक स्वप्नील मुरकर, लेखिका विभावरी देशपांडे हे सगळे कलाकारांच्या सतत संपर्कात असतात.

मंगेश कदम, लीना भागवत यांचं शूटिंग दादरला मुंबईत होत आहे. तर सखी आणि सुव्रत हे सध्या लंडनला आहेत. भारतापेक्षा आठ तास मागे असल्याने त्यांचं शूटिंग शेड्युलसुद्धा वेगळं आहे. त्यामुळे, टीम त्यांच्या वेळेशी जुळवून घेत या मालिकेचं शूटिंग करत आहे. तर लंडनमध्ये बसूनही मराठी मालिकेत काम करायला मिळत असल्याने सुव्रत आणि सखी सध्या आनंदात आहेत. एकूणच मालिकेच्या निमित्ताने सारं काही होममेड करायचं असं ठरलं आहे. आता वाट पाहायची ही अतरंगी पात्र आपल्या भेटीला येण्याची.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.