ETV Bharat / sitara

मुंबईत निराश अभिनेत्रीची उडी घेऊन आत्महत्या - apartment in Oshiwara

यश मिळत नसल्यामुळे निराश झालेल्या पंजाबी अभिनेत्रीने टेरेसवरुन उडी मारुन आत्महत्या केली आहे. मुंबई पोलीस पुढील तपास करीत आहेत.

अभिनेत्रीची आत्महत्या
author img

By

Published : Aug 30, 2019, 1:46 PM IST

मुंबई - ओशिवारा येथील रहिवासी असलेल्या एका अभिनेत्रीने तिसऱ्या मजल्यावरुन उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पर्ल पंजाबी (pearl punjabi) असे या अभिनेत्रीचे नाव सांगण्यात येत आहे.
एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, बऱ्याच दिवसापासून ती सिनेसृष्टीत पदार्पण करण्याचा प्रयत्न करत होती. मात्र, तिला यश मिळाले नव्हते.

ही अभिनेत्री जिथे राहत होती, तेथील सुरक्षा रक्षकाने याबाबत पोलिसांना माहिती दिली. ती मानसिकदृष्ट्या खचलेली होती. तिच्या आईसोबतही तिचं भांडण झालं होतं. तसेच तिने यापूर्वीदेखील आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र, तिला वाचवण्यात आलं होतं, अशीही माहिती समोर येत आहे.

या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.