ETV Bharat / sitara

‘१९६२ : द वॉर इन द हिल्स’ : मांजरेकर पिता-पुत्र पुन्हा एकदा एकत्र!

‘१९६२ : द वॉर इन द हिल्स’ या चित्रपटात महेश मांजरेकर आणि त्यांचे चिरंजीव सत्या पुन्हा एकदा एकत्र काम करीत आहेत. महेश मांजरेकरांनी आपला पुत्र सत्या कडून दमदार अभिनय करून घेतला आहे. १९६२: द वॉर इन द हिल्स ही मालिका २६ फेब्रुवारी २०२१ रोजी केवळ डिस्नी+ हॉटस्टार व्हीआयपी आणि डिस्नी+ हॉटस्टार प्रिमीअमवर प्रदर्शित होणार आहे.

Manjrekar father and son together again
‘१९६२ : द वॉर इन द हिल्स’
author img

By

Published : Feb 12, 2021, 7:53 PM IST

मुंबई - मांजरेकर पिता-पुत्राची जोडी म्हणजेच महेश मांजरेकर आणि त्यांचे चिरंजीव सत्या पुन्हा एकदा एकत्र काम करीत आहेत. ‘आई’. ‘एफ यु : फन अनलिमिटेड’ सारख्या चित्रपटातून सत्याने आपले वडील महेश मांजरेकर यांच्या दिग्दर्शनाखाली काम केले होते. सत्य घटनांनी प्रेरित असलेली ‘१९६२ : द वॉर इन द हिल्स’ ही युद्ध-मालिका लवकरच प्रकाशित होणार आहे त्यात महेश मांजरेकरांनी आपला पुत्र सत्या कडून दमदार अभिनय करून घेतला आहे.

Manjrekar father and son together again
मांजरेकर पिता-पुत्र पुन्हा एकदा एकत्र
अभिनेता सत्या मांजरेकर ‘१९६२ : द वॉर इन द हिल्स’ या त्याचे वडील महेश मांजरेकर यांचे दिग्दर्शन असलेल्या युद्धमालिकेतून डिजिटल पदार्पणासाठी सज्ज आहे. यापूर्वी पिता-पुत्राच्या या जोडीने मराठी चित्रपटांसोबतच ‘वाह! लाइफ हो तो ऐसी’ या हिंदी चित्रपटासाठीसुद्धा एकत्र काम केले आहे. आता सत्या ‘सी कंपनी’ च्या बटालियनमधील गोपालची भूमिका निभावताना दिसणार आहे, जो संपूर्ण बटालियनमधील सर्वात तरुण सैनिक आहे. या मालिकेत अभय देओल, सुमित व्यास, अनुप सोनी, माही गिल आणि रोहन गंडोत्रा यांच्यासह अनेक प्रसिद्ध अभिनेत्यांच्या भूमिका आहेत. याबद्दलचे तपशील हळू हळू बाहेर येताहेत. हॉटस्टार स्पेशल्स मालिका ‘१९६२: द वॉर इन द हिल्स’ सत्यघटनांनी प्रेरित आहे. ३००० हजार चिनी सैनिकांच्या फौजेपुढे भारतीय लष्करातील १२५ भारतीयांच्या शौर्य व धाडसाची ही आत्तापर्यंत कधीही न सांगितलेली गाथा आहे.
Manjrekar father and son together again
मांजरेकर पिता-पुत्र पुन्हा एकदा एकत्र
अभिनेता सत्या मांजरेकर वडिलांसोबत काम करण्याच्या अनुभवाबाबत म्हणाला, “लहानपणापासून माझे बाबा- एक अभिनेता व दिग्दर्शक म्हणून माझे आदर्श व प्रेरणास्थान आहेत. त्यांची कला मी गेल्या अनेक वर्षांपासून काळजीपूर्वक बघत आहे. ते एक दिग्दर्शक म्हणून किती सुंदर पद्धतीने कथेला आकार देतात आणि तेवढ्याच सुंदर पद्धतीने अभिनयही करतात हे मी बघत आलो आहे. प्रतिभा आणि नम्रता हे दोन्ही गुण मोठ्या प्रमाणात अंगी असलेले लोक खूप कमी असतात आणि माझे बाबा त्यांच्यापैकी एक आहेत.”
Manjrekar father and son together again
मांजरेकर पिता-पुत्र पुन्हा एकदा एकत्र
सत्या नेहमीच त्यांच्या कष्टाने आणि संघर्षाने त्यांच्यासारखे होण्यासाठी प्रेरित होत असतो. तो पुढे म्हणतो की, “१९६२: द वॉर इन द हिल्स चे शूटिंग अगदी मनमोकळ्या वातावरणात पार पडले. माझ्या असंख्य शंकांचं बाबानीन थकता वा रागावता निरसन केलं. मीच नाही तर कलावंतांची सगळी टीम त्यांच्यासोबत काम करताना तेवढ्याच मोकळेपणाचा अनुभव घेत होती असे माझे निरीक्षण आहे. मी जेव्हा बाबांसोबत काम करतो, तेव्हा सेटवर असणे घरात असल्यासारखे वाटते.”
Manjrekar father and son together again
मांजरेकर पिता-पुत्र पुन्हा एकदा एकत्र
सत्या मांजरेकर मेजर सूरजसिंग (अभय देओल) यांच्या नेतृत्वाखालील गोपाल नामक, बटालियनमधील सर्वांत तरुण, लष्करी सैनिकाची भूमिका करत आहे. हॉटस्टार स्पेशल्स प्रस्तुत १९६२: द वॉर इन द हिल्स ही मालिका २६ फेब्रुवारी २०२१ रोजी केवळ डिस्नी+ हॉटस्टार व्हीआयपी आणि डिस्नी+ हॉटस्टार प्रिमीयमवर प्रदर्शित होणार आहे.हेही वाचा - मनी लाँडरिंग प्रकरणी राज कपूर यांचा नातू अरमान जैनला ईडीकडून समन्स

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.