मुंबई - अभिनेता अभिषेक बच्चन याने तुरुंगातील कैद्यांना ‘दसवी’ चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर अभिषेक दिलेल्या वचनानुसार आग्रा येथे परत आला आणि तुरुंगातील 2,000 कैद्यांसाठी 'दसवी'चे विशेष स्क्रीनिंग आयोजित केले. या खास स्क्रिनिंगच्यावेळी चित्रपटातील कालाकार व स्क्रूसह अभिषेक बच्चन, यामी गौतम, निम्रत कौर आणि दिग्दर्शक तुषार जलोटा यांनी हजेरी लावली होती. या स्क्रिनिंगच्यावेळी त्यांचे भव्य सेटअपमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वागत केले.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
अनेक अविस्मरणीय क्षणांची आठवण करून देत अभिषेकने मीडियाच्या काही सदस्यांना उत्साहाने 'मचा मचा' हे गाणे आणि इतर महत्त्वाची दृश्ये शूट केलेली जागा दाखवली. त्यांनी लायब्ररीतील कैद्यांना अनेक पुस्तकेही दान केली आहेत.
त्याने कैद्यांशी बोलत असलेली व्हिडिओ क्लिपिंग शेअर केली आणि त्याला कॅप्शन दिले, ''एक वादा है वादा का. काल रात्री मी एक वर्षापूर्वी दिलेले वचन पूर्ण करण्यात यशस्वी झालो. आग्रा सेंट्रल जेलच्या रक्षक आणि कैद्यांसाठी आमच्या चित्रपट हॅशटॅग 'दसवी' चे पहिले स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले होते. आम्ही येथे चित्रपटाचे चित्रीकरण केले, त्यांच्यासोबत घालवलेल्या वेळेच्या आठवणी मी माझ्या उर्वरित आयुष्यासाठी लक्षात ठेवेन.''
जिओ स्टुडिओज आणि दिनेश विजन प्रस्तुत, दसवी हा चित्रपट नेटफ्लिक्स आणि जिओ सिनेमावर ७ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा - 'पठाण'च्या स्पेन शूटिंगमधील चाहत्यांसोबतचे शाहरुखचे फोटो व्हायरल