ETV Bharat / sitara

२०१९ मध्ये प्रेक्षकांवर प्रभाव टाकलेले मराठी चित्रपट - २०१९ वर्षाला राम राम करीत असताना मराठी चित्रपटसृष्टीत

२०१९ सालाला राम राम करताना गेल्या वर्षभरात मराठी प्रेक्षकांना प्रभावित करुन गेलेल्या काही चित्रपटांचा आढावा आपण घेत आहोत.

Marathi movie in 2019
प्रभाव टाकलेले मराठी चित्रपट
author img

By

Published : Dec 25, 2019, 2:47 PM IST

२०१९ वर्षाला राम राम करीत असताना मराठी चित्रपटसृष्टीत लक्षवेधी ठरलेल्या काही चित्रपटांकडे आपण वळून पाहूयात. नवीन वर्षाच्या सुरुवातीला मोठे आकर्षण होते ते म्हणजे 'भाई : व्यक्ती की वल्ली' या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचे. या चित्रपटावर टीका करणारेही काहीजण होते तर बऱ्याच जणांच्या पसंतीस चित्रपट उतरला होता.

यानंतर 'नशिबवान' हा भाऊ कदमचा चित्रपट झळकला. चित्रपटाकडून खूप अपेक्षा निर्मात्यासह प्रेक्षकांनी बाळगल्या होत्या. मात्र, बॉक्स ऑफिसवर अपेक्षित कमाई 'नशिबवान' करु शकला नव्हता.

यावर्षाच्या सुरुवातीला बाळासाहेब ठाकरे यांचा चरित्रपट महाराष्ट्राचे आकर्षण होते. नवाजुद्दीन सिद्दीकीने ठाकरेंची व्यक्तीरेखा साकारली होती. हिंदीत बनलेल्या या चित्रपटाचे मराठीत डबींग करण्यात आले. सुरुवातीला यात बाळासाहेबांच्या पात्राला सचिन खेडकर यांचा आवाज डब करण्यात आला होता. मात्र चेतन सतशील यांचा आवाज बदलण्यात आला. या चित्रपटाला भरपूर प्रतिसाद मिळाला.

२०१९ हे वर्षा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे होते. त्यामुळे यंदाच्या मराठी सिनेमा रिलीजवर त्याला परिणाम झाला. त्यामुळे तुलनेने कमी चित्रपट निर्माण झाले. रवी जाधव यांचा 'रंपाट' आणि श्रावणी देवधर यांच्या 'मोगरा फुलला' या चित्रपटांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधले.

मुक्ता बर्वे आणि ललित प्रभाकर यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'स्माईल प्लिज'ला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर अमेय वाघ आणि सई ताम्हणकरच्या 'गर्लफ्रेंड' सिनेमाने प्रेक्षकांनी चित्रपटगृहात खेचून आणले.

हेमंत ढोमे दिग्दर्शित 'येरे येरे पैसा' सिनेमाच्या सीक्वलला चांगला प्रतिसाद मिळाला. यात संजय नार्वेकर आणि अनिकेत विश्वासराव यांच्या मुख्य भूमिका होत्या.

दरम्यान रिंकू राजगुरूच्या दुसऱ्या चित्रपटाची प्रतीक्षा प्रेक्षक करीत होते. यावेळी ती एका राजकीय चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार होती. एकिकडे राजकारणाची हवा तापायला सुरूवात झाली असताना 'कागर' या चित्रपटाची एन्ट्री झाली आणि रिंकूला प्रेक्षकांनी पुन्हा स्वीकारले. 'सैराट' इतका प्रतिसाद मिळाला नसला तरी तिच्यातील उत्तम अभिनयाचा पुनःप्रत्यय प्रेक्षकांनी अनुभवला.

विशेष म्हणजे ऐतिहासिक चित्रपटांना प्रतिसाद मिळतोय हे लक्षात घेऊन यंदाही त्याची निर्मिती मराठीत झाली. त्यापैकी एक चित्रपट होता 'फत्तेशिकस्त' आणि दुसरा 'हिरकणी'. दिग्पाल लांजेकरने दिग्दर्शित केलेला 'फत्तेशिकस्त' कमाल करुन गेला. तर प्रसाद ओकचे दिग्दर्शन असलेल्या 'हिरकणी' चित्रपटाने प्रेक्षकांचे लक्ष चांगलेच वेधले.

'आसूड' या चित्रपटाची यावर्षीच्या चित्रपटांमध्ये खास नोंद घेतली गेली पाहिजे. निलेश जळमकर या विदर्भातील तरुण दिग्दर्शकाने 'आसूड'ची निर्मिती केली. एक दणकट, शिक्षीत नायक यात व्यवस्थेच्या विरोधात लढताना दिसला. विदर्भ वगळता याचे नीट प्रदर्शन राज्यभर होऊ शकले नाही. त्यामुळे एक उत्तम प्रयत्न प्रेक्षकापर्यंत पोहोचला नाही.

दरम्यान अंकुश चौधरीचा 'ट्रिपल सीट' सिनेमा चांगलाच भाव खावून गेला. शिवानी सुर्वे आणि पल्लवी पाटील यांच्या भूमिका असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन संकेत पावसे यांनी केलं होतं. संजय दत्त प्रॉडक्शनच्या 'बाबा' या सिनेमाचीही चांगली चर्चा झाली. तर 'टकाटक' या द्विअर्थी कॉमेडी चित्रपटाने तरुणांच्यात लोकप्रियता मिळवली. संजय जाधव यांचा 'खारी बिस्कीट' हा चित्रपटही यंदाचे आकर्षण ठरला होता. अंध बहिणीसाठी धडपडणाऱ्या छोट्या भावाची ही संवेदनशील कथा होती.

यंदाच्या लक्षवेधी सिनेमांच्या यादीत मोठे नाव आहे 'आनंदी गोपाळ' या मराठी सिनेमाचे. भारताची पहिली महिला डॉक्टर असलेल्या आनंदीबाई जोशींच्या जीवनावरील हा चित्रपट प्रेक्षकांनी आणि समिक्षकांनी खूप नावाजला. मात्र बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल करु शकला नाही. असंख्य पुरस्कार या सिनेमाला मिळाले आहेत.

२०१९ च्या वर्षाची अखेर उत्तम सिनेमाने होत आहे. 'कुलकर्णी चौकातला देशपांडे' हा गजेंद्र अहिरेंचा सिनेमा चांगलाच चर्चेत राहिला. त्यानंतर आलेला 'विकी वेलिंगकर' सिनेमानेही चांगलीच हवा निर्माण केली. आता वर्ष अखेरील 'आटपाडी नाईट्स' हा सिनेमा रिलीज होतोय. याच्या ट्रेलर आणि गाण्यांनी सध्या धमाल उडवून दिलीय. यंदाच्या वर्षाला राम राम करीत असताना आगामी वर्षात मराठीच्या लौकिकाला साजेशे दर्जेदार, आशयघन चित्रपट निर्माण होतील ही अपेक्षा बाळगूयात. सितारा डेस्क. ईटीव्ही भारत.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.