ETV Bharat / sitara

Will Smith apologizes: विल स्मिथचा माफीनामा : ''मी मर्यादा ओलांडली आणि मी चूक होतो'' - स्मिथने रॉकला मारलेल्या थप्पडीचा निषेध

ऑस्करच्या मंचावर ख्रिस रॉकला थप्पड मारल्यानंतर विल स्मिथने कॉमेडियन, अकादमी आणि घरातील प्रेक्षकांची माफी मागितली. आपण मर्यादा ओलांडल्याचे व चूकीचे वागल्याचे त्याने मान्य केले आहे. सोशल मीडियावर स्मिच्यावतीने एक माफीनामा असलेले निवेदन प्रसिध्द करण्यात आले आहे.

विल स्मिथचा माफीनामा
विल स्मिथचा माफीनामा
author img

By

Published : Mar 29, 2022, 12:21 PM IST

लॉस एंजेलिस - ऑस्कर 2022 समारंभात विल स्मिथने रॉकला लगावलेल्या थप्पडचा आवाज दुसऱ्या दिवशीही घुमत राहिला. त्याच्या या कृतीने डॉल्बी थिएटरमधील गर्दीला आणि घरातील प्रेक्षकांना थक्क केले. अॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्स आर्ट्स अँड सायन्सेसने स्मिथने रॉकला मारलेल्या थप्पडीचा निषेध केला. रॉकने विल स्मिथची पत्नी जाडा पिंकेट स्मिथची चेष्टा केली होती आणि याची चौकशी सुरू केली जाईल, असे अकादमीने म्हटले आहे. त्यादिवशी स्मिथ याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाल्यानंतर केलेल्या भाषणात त्याने सर्वांची माफी मागितली परंतु त्यामध्ये रॉकच्या माफीचा समावेश नव्हता.

"सर्व प्रकाराची हिंसा विषारी आणि विनाशकारी आहे," असे स्मिथने त्याच्या प्रचारकाने जारी केलेल्या आणि इन्स्ट्ग्रामवर पोस्ट केलेल्या निवेदनात म्हटले आहे. "काल रात्रीच्या अकादमी पुरस्कारांमध्ये माझे वर्तन अस्वीकार्य आणि अक्षम्य होते. माझ्या खर्चावर विनोद करणे हा कामाचा एक भाग आहे. पण जाडाच्या वैद्यकीय स्थितीबद्दलचा विनोद माझ्यासाठी खूप सहन करण्यापलीकडचा होता आणि मी भावनिक प्रतिक्रिया दिली. ख्रिस, मी जाहीरपणे तुझी माफी मागू इच्छितो. मी मर्यादेच्या बाहेर होतो आणि मी चूक होतो. मला लाज वाटली आणि माझी कृती योग्य नव्हती. प्रेम आणि दयाळू जगात हिंसेला थारा नाही.''

53 वर्षीय अभिनेता विल स्मिथने फिल्म अकादमी, टेलिकास्टचे निर्माते, उपस्थित, प्रेक्षक आणि विल्यम्स कुटुंबाची माफी मागितली. “किंग रिचर्ड” चित्रपटामध्ये व्हीनस आणि सेरेनाचे वडील रिचर्ड विल्यम्सच्या भूमिकेसाठी रविवारी स्मिथला सन्मानित करण्यात आले. "मी प्रगतीपथावर काम करत आहे," असे स्मिथने पुढे म्हटले आहे.

हेही वाचा - 'rrr' ने जगभरात पार केला 500 कोटी रुपयांचा टप्पा

ऑस्करच्या मंचावर ख्रिस रॉकला थप्पड
ऑस्करच्या मंचावर ख्रिस रॉकला थप्पड

या घटनेवर चर्चा करण्यासाठी सोमवारी बोर्ड ऑफ गव्हर्नरची बैठक बोलावल्यानंतर, फिल्म अकादमीने सांगितले की ते स्मिथच्या कृतींचा सविस्तर पुनरावलोकन केले जाईल आणि नियम, शिस्त आणि कॅलिफोर्निया कायद्यानुसार पुढील कारवाई आणि परिणामांचा शोध घेण्यात येईल." लॉस एंजेलिस पोलीस विभागाने रविवारी सांगितले की त्यांना या घटनेची माहिती होती परंतु ते तपास करत नव्हते कारण संबंधित व्यक्तीने पोलीसाकडे तक्रार करण्यास नकार दिला. स्मिथने जेव्हा रॉकला स्टेजवर मारले तेव्हा डॉल्बी थिएटरच्या गर्दीला आणि घरातील प्रेक्षकांना धक्का बसला होता.

ऑस्कर 2022 समारंभात विल स्मिथ
ऑस्कर 2022 समारंभात विल स्मिथ

स्मिथने का मारला क्रिसला मारले? - क्रिस रॉकने विल स्मिथची पत्नी जाडा पिंकेट स्मिथ जेनची मस्करी केली. जाडाच्या टक्कलपणामुळे तिला हा चित्रपट मिळाला आहे. या चित्रपटासाठी जाडाने तिचे केस कापले नाहीत. ती अलोपेसिया या केस गळण्याचा आजार झाला आहे. रॉकच्या या वक्तव्यानंतर आपल्या पत्नीचा सर्वांसमोर झालेला अपमान विल स्मिथला सहन झाला नाही आणि त्याने क्रिसला मारले.

ऑस्कर 2022 समारंभात विल स्मिथ
ऑस्कर 2022 समारंभात विल स्मिथ

या घटनेनंतर एका तासाच्या आत स्मिथने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जिंकला, त्याला उभे राहून स्वागत मिळाले. त्याच्या पाच मिनिटांच्या पुरस्कार स्वीकृती भाषणादरम्यान, स्मिथ आपल्या कुटुंबाचा बचाव करण्याबद्दल बोलला. त्यांनी अकादमीची माफीही मागितली.

ऑस्कर 2022 समारंभात विल स्मिथ
ऑस्कर 2022 समारंभात विल स्मिथ

विल स्मिथच्या या कृतीने ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला गालबोट लागल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. यामध्ये काही माजी ऑस्कर होस्टचाही समावेश आहे. जगभरातून स्मिथवर टीका करण्यात आली. स्मिथसाठी हा दिवस सेलेब्रिशनचा असताना त्याचे हे वागणे बरे नव्हते अशी प्रतिक्रियाही काही दिग्गजांनी दिली आहे. तर अनेकांनी स्मिथच्या या वागण्यावर मौन बळगले आहे तर काहीजण त्याचे समर्थनही करीत आहेत.

हेही वाचा - यंदाच्या ईदला रिलीज होणार नाही सलमानचा सिनेमा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.