हैदराबाद - तामिळ सुपस्टार विजय सेथुपती संतोश सिवन दिग्दर्शित 'मुंबईकर' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या चित्रपटाचे पोस्टरही सोशल मीडियावर प्रसिध्द करण्यात आले आहे. आज नुकतेच विजयने चित्रपटातील पहिला लूक चाहत्यांसाठी शेयर केला आहे.
गेल्या वर्षी ऑक्टोंबरमध्ये विजयचा 'का पै रनसिंगम' हा चित्रपट ओटीटीवर रिलीज झाला होता. जानेवारीत त्याने 'मुंबईकर' चित्रपटाची घोषणा केली. हा चित्रपट २०२७ च्या 'मनगरम' या प्रसिध्द चित्रपटाचा हिंदी रिमेक असेल. सोमवारी विजयने इंस्टाग्रामवर मुंबईकर अशी कॅप्शन टाकत पहिला लूक शेयर केला. या चित्रपटात मुंबईकरांचे जीवन मांडण्यात येणार आहे.
हेही वाचा - गाण्याच्या रेकॉर्डिंगने करण्यात आला ‘लाव' चित्रपटाचा मुहूर्त!
मुंबईकर हे इमोशन
याबद्दल चित्रपटाचे दिग्दर्शक संतोष सिवन म्हणाले की, मुंबई हे एक मोठे शहर आहे. भारताच्या कानाकोपऱ्यातून येथे अनेक तरुण आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी येतात. एखादा अनोळखी मनुष्य आपले पूर्ण आयुष्य बदलून टाकतो. या सिमेंटच्या जंगलात अजूनही माणुसकी टिकून आहे. मुंबई ही मेट्रो शहर असले तरीही 'मुंबईकर' ही भावना आहे. म्हणून चित्रपटाचे टायटल हे मुंबईकर असल्याचे त्याने सांगितले. या चित्रपटात विजयसोबतच अभिनेत्री तान्या मानीकतला, संजय मिश्रा, रणवीर शौरे, सचिन खेडकर आणि हृिदू हरून हे कलाकार आहेत.
हेही वाचा - स्वप्निल जोशीच्या ‘बळी’ने वाढवली उत्सुकता