मुंबई - दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांचा बऱ्याच दिवसानंतर 'शिकरा' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमध्ये १९९० साली काश्मीरमध्ये बेघर झालेल्या नागरिकांच्या कथेची झलक पाहायला मिळते.
चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात दोन प्रेमीयुगुलांपासून होते. अचानक घराबाहेर गोंधळ सुरू होतो. बाहेर अनेक घरे जळत असताना दिसतात. अशा परिस्थितीत त्यांचा कसा संघर्ष होतो, याची झलक या ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. हा ट्रेलर अंगावर काटा आणणारा आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
अशी आहे कथा -
'शिकरा-अ लव्ह लेटर फ्रॉम काश्मीर', ही कथा काश्मीरच्या १९९० साली घडलेल्या घटनेवर आधारित आहे. काश्मीरच्या एका समुदायाला बेघर करण्यात आले होते. ३० वर्षानंतरही ते आपल्या घरी परतू शकले नाही.
या चित्रपटातून नवीन जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सादिया आणि आदिल खान हे दोघेही या चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण करत आहेत. सादिया शांतीची भूमिका साकारत आहे तर आदिल शीवच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचं पार्श्वसंगीत ए. आर. रेहमान यांनी केलं असून सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.
७ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाची निर्मिती फॉक्स स्टार स्टूडिओज अंतर्गत करण्यात आली आहे.