मुंबई - अभिनेता विकी कौशलच्या 'भूत' चित्रपटाची बऱ्याच दिवसांपासून चर्चा आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लुक आणि पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर चाहत्यांना ट्रेलरची उत्सुकता आहे. त्यापूर्वी या चित्रपटाचा हॉरर टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. यामध्ये विकी कौशलची झलक पाहायला मिळते.
अंधाऱ्या खोलीत रक्ताने माखलेल्या हातांमध्ये विकी कौशल फसतो, असे या टीझरमध्ये पाहायला मिळते. अतिशय भयावह झलक असलेला हा टीझर आहे. या चित्रपटाचा ट्रेलर ३ तारखेला प्रदर्शित होणार आहे.
-
#BhootTeaser hooks you with scary visuals... Awaiting #BhootTrailer [on 3 Feb 2020]... #Bhoot Part One: #TheHauntedShip Teaser: pic.twitter.com/PRFhEOtqz5
— taran adarsh (@taran_adarsh) January 31, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#BhootTeaser hooks you with scary visuals... Awaiting #BhootTrailer [on 3 Feb 2020]... #Bhoot Part One: #TheHauntedShip Teaser: pic.twitter.com/PRFhEOtqz5
— taran adarsh (@taran_adarsh) January 31, 2020#BhootTeaser hooks you with scary visuals... Awaiting #BhootTrailer [on 3 Feb 2020]... #Bhoot Part One: #TheHauntedShip Teaser: pic.twitter.com/PRFhEOtqz5
— taran adarsh (@taran_adarsh) January 31, 2020
हेही वाचा -कंगनाच्या हेअरस्टायलिस्टचा बॉलिवूडमध्ये ५० वर्षांचा प्रवास, 'या' अभिनेत्रींसोबतही केले काम
विकी कौशलसोबत भूमी पेडणेकर देखील या चित्रपटात झळकणार आहे. भानू प्रताप सिंग यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर, करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शन अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. २१ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा -'पृथ्वीराज' चित्रपटातील गाण्याचे शूटिंग पूर्ण, मानुषीने शेअर केली झलक