ETV Bharat / sitara

विकी कौशलचा भाऊ सनी 'या' चित्रपटात मुख्य भूमिकेत, पोस्टर प्रदर्शित - sunny koushal news

'भांगरा पाले' असे त्याच्या आगामी चित्रपटाचं नाव आहे. रॉनी स्क्रुवालाने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. आज म्हणजे ३० सप्टेंबरलाच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे.

विकी कौशलचा भाऊ सनी 'या' चित्रपटात मुख्य भूमिकेत, पोस्टर प्रदर्शित
author img

By

Published : Sep 30, 2019, 10:06 AM IST

मुंबई - बॉलिवूडमध्ये अल्पावधीतच आपली वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता म्हणजे विकी कौशल. 'मसान', 'संजू', 'राझी' आणि 'उरी - द सर्जिकल स्ट्राईक' यांसारख्या चित्रपटातून त्याने तुफान लोकप्रियता मिळवली आहे. त्याचा भाऊ सनी कौशलनेही बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण केली आहे. लवकरच तो आगामी चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटाचं पोस्टरही प्रदर्शित झालं आहे.

'भांगरा पाले' असे त्याच्या आगामी चित्रपटाचं नाव आहे. रॉनी स्क्रुवालाने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. आज म्हणजे ३० सप्टेंबरलाच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत रुकसार धिल्लोन ही नवोदित अभिनेत्री भूमिका साकारणार आहे. तसंच श्रीया पिळगावंकरचीही यामध्ये भूमिका आहे. स्नेहा तौरानी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.

  • Trailer drops today at 12 noon... First look poster of #BhangraPaaLe... Stars Sunny Kaushal, Rukshar Dhillon and Shriya Pilgaonkar... Directed by Sneha Taurani... Produced by Ronnie Screwvala... 1 Nov 2019 release. pic.twitter.com/WrJeFM7GC0

    — taran adarsh (@taran_adarsh) September 30, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

सनी कौशलने त्याच्या अभिनयाची सुरुवात नाटकांपासून केली होती. 'सनशाईन म्यूझिक टूर्स अँड ट्रॅव्हल्स' या चित्रपटातून त्याने चित्रपटात पदार्पण केलं होतं. २०१६ साली त्याने एका शॉर्टफिल्ममध्येही भूमिका साकारली होती. तसंच त्याच्या वेबसीरिजही मोठी लोकप्रियता पाहायला मिळते. त्याच्या 'लव्ह अॅट फर्स्टसाईट' आणि 'ऑफिशिअल चुकीयागीरी' या दोन्हीही वेबसीरिज चाहत्यांच्या पसंतीस उतरल्या.

हेही वाचा -सईचा नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, फर्स्ट लूक प्रदर्शित

सनीने सहाय्यक दिग्दर्शकाचेही काम केले आहे. त्याने 'गुंडे' आणि 'माय फ्रेंड पिंटो' यांसारख्या चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शकाचं काम केलं आहे.
याशिवाय अक्षय कुमारच्या 'गोल्ड' चित्रपटात त्याने सहाय्यक अभिनेत्याची भूमिका साकारली होती. यामध्ये तो 'हिम्मत सिंग' या खेळाडूच्या भूमिकेत झळकला होता.

आता तो 'भांगरा पाले' या चित्रपटात मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. त्याच्या या चित्रपटाला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात, हे पाहणे रंजक ठरेल. १ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होईल.

हेही वाचा -पॅरिस फॅशन वीकमध्ये ऐश्वर्या रायच्या लूकची भूरळ, पाहा व्हिडिओ

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.