ETV Bharat / sitara

ज्येष्ठ कोरिओग्राफर शिवा शंकर यांचे कोरोनामुळे निधन, सोनू सूदने व्यक्त केले दुःख

ज्येष्ठ कोरिओग्राफर शिवा शंकर यांचे वयाच्या ७२ व्या वर्षी निधन झाले. शिवा शंकर यांना काही काळापूर्वी कोरोनाची लागण झाली होती, त्यानंतर त्यांना हैदराबादच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

author img

By

Published : Nov 29, 2021, 7:20 PM IST

शिवा शंकर यांचे कोरोनामुळे निधन
शिवा शंकर यांचे कोरोनामुळे निधन

हैदराबाद - गेल्या २ वर्षांपासून कोरोनाने अवघ्या जगभरात हाहाकार माजवला आहे. त्याचे सावट सिनेसृष्टीवरही पाहायला मिळाले. कोरोनाच्या विळख्यात सापडून, अनेक कलाकारांना आपला जीव गमवावा लागला.अशातच दाक्षिणात्य सिनेसृष्टीतून एक दुःखद बातमी समोर येत आहे. ज्येष्ठ कोरिओग्राफर शिवा शंकर यांचे वयाच्या ७२ व्या वर्षी निधन झाले. शिवा शंकर यांना काही काळापूर्वी कोरोनाची लागण झाली होती, त्यानंतर त्यांना हैदराबादच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

सोनू सूदने व्यक्त केले दुःख
सोनू सूदने व्यक्त केले दुःख

काही दिवसांपूर्वी, कोरिओग्राफर शिवा शंकर आणि त्यांचा मोठा मुलगा कोरोना विषाणूच्या विळख्यात सापडला होता. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृती खालावल्याने शिवा शंकर यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आले. आता त्यांच्या निधनामुळे दक्षिण उद्योगाला मोठा धक्का बसला आहे.

सोनू सूदनेही व्यक्त केले दुःख

सोनू सूदनेही मास्टर गुरू शिवा शंकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. त्याने लिहिले की, “शिवा शंकर मास्टर जी यांच्या निधनाची बातमी ऐकून मन हेलावले. आम्ही त्यांना वाचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला, पण देवाची वेगळीच योजना होती. मास्टरजी तुमची कायम आठवण राहील. देव त्यांच्या कुटुंबीयांना या दुःखावर मात करण्याची शक्ती देवो. सिनेमा सदैव तुमची आठवण ठेवेल, सर.”

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.