ETV Bharat / sitara

'अखेरच्या श्वासापर्यंत नाटक करत राहू', रंगकर्मींनी अरुण काकडे यांना दिला अखेरचा निरोप - arun kakade news

मराठी रंगभूमी, प्रायोगिक रंगभूमी, आणि आविष्कारच्या नाट्य चळवळीत कधी ना कधी सक्रिय असलेल्या प्रत्येक रंगकर्मी काकडे काकांना अखेरचा निरोप देण्यासाठी अंधेरीतील आधारवाडी स्मशानभूमीत जमला होता.

'अखेरच्या श्वासापर्यंत नाटक करत राहू', रंगकर्मींनी अरुण काकडे यांना दिला अखेरचा निरोप
author img

By

Published : Oct 10, 2019, 9:13 AM IST

मुंबई - ज्येष्ठ रंगकर्मी आणि अविष्कार नाट्यसंस्थेचे सर्वेसर्वा अरुण काकडे यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पन्नास वर्षे त्यांनी रंगभूमीची सेवा केली. त्यांच्या जाण्याने प्रयोगशील रंगभूमीवरचा एक अवलिया हरपल्याची भावना नाट्यवर्तुळात आहे. त्यांच्यावर बुधवारी रात्री (९ ऑक्टोंबर) अंत्यसंस्कार करण्यात आले.

मराठी रंगभूमी, प्रायोगिक रंगभूमी, आणि आविष्कारच्या नाट्य चळवळीत कधी ना कधी सक्रिय असलेल्या प्रत्येक रंगकर्मी काकडे काकांना अखेरचा निरोप देण्यासाठी अंधेरीतील आधारवाडी स्मशानभूमीत जमला होता. नाटक हाच श्वास आणि ध्यास समजून व्रतस्थ आयुष्य जगलेल्या या व्यक्तीला आपण सगळे अखेरच्या श्वासापर्यंत नाटक करत राहू, अशी ग्वाही देत रंगकर्मींनी श्रद्धांजली अर्पण केली.

रंगकर्मींनी अरुण काकडे यांना दिला अखेरचा निरोप

गेले महिनाभर आपल्या आजाराने त्रस्त असलेल्या काकडे काकांनी आपला झुंजार बाणा या आजाराशी सामना करतानाही जपला होता. गेले १० दिवस त्यांना मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, आयुष्यात कधीतरी तिसरी घंटा वाजयचीच होती. काल दुपारी अडीच वाजता ती वाजली आणि काकडे काकांच निधन झालं. प्रायोगिक नाटक जगवणे आणि ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणे हा एकच ध्यास त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत जपला.

हेही वाचा -ज्येष्ठ रंगकर्मी अरुण काकडे यांचे दीर्घ आजाराने निधन

जुन्या पिढीतील ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, ज्येष्ठ अभिनेत्री प्रेमा साखरदांडे या आविष्कारच्या सुरुवातीच्या काळातील सहकार्यासोबतच, नाना पाटेकर, सुमित राघवन, सुनील बर्वे, चंद्रकांत कुलकर्णी, शफाअत खान, राहुल रानडे, प्रशांत दळवी, अनंत पणशीकर, अरुण होरणेकर, चिन्मयी सुमित, सुहिता थत्ते तर आजच्या तरुण पिढीतील दीपक राजाध्यक्ष, सुशील इनामदार, ललित प्रभाकर, आरती वडगबालकर, कल्याणी पाठारे, ज्ञानेश झोटिंग, कैलास वाघमारे, गणेश राऊत अश्या अनेक तरुणांनी काकडे काकांना श्रद्धांजली अर्पण केली. याशिवाय अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी, आणि ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष नाटककार प्रेमानंद गजवी हे देखील यावेळी उपस्थित होते.

काकडे काकांच्या अंगात असलेली प्रचंड ऊर्जा आणि सकारात्मकता ते कायम पुढच्या पिढीला देत राहिले. त्यामुळे त्यांच्या पश्चात कायम नाटक करत राहण्याची शपथ सगळ्यांनी घेतली. त्यासोबत पुढच्या २ वर्षात आविष्कार नाट्यसंस्थेला ५० वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त एक भव्य नाट्यमहोत्सव आयोजित करण्याचा विचार काकडे काकांच्या मनात घोळत होता. त्याची तयारी आणि स्वरूपही त्यांनी तयार करायला घेतलं होत. आज काकडे काका हयात नसले, तरीही त्यांची ही इच्छा आम्ही सगळे रंगकर्मी मिळून नक्की पूर्ण करू, असे दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी यावेळी सांगितलं.

Intro:(नाना ने बाईट दिला नाही, रोहिणी हट्टंगडी सुद्धा नाही म्हणाल्या फक्त प्रेमानंद गजवी आणि चंद्रकांत कुलकर्णी यांनी बाईट दिला जे मी पहिल्यांदा नवीन वायर लावून घेतले पण त्याच्या ऑडियो मध्ये प्रॉब्लेम आलाय. सो व्हिज्युअल्सवर बातमी चालवा.)

'आविष्कार' नाट्यचळवळीचे आधारवड ज्येष्ठ रंगकर्मीं अरुण काकडे यांच्यावर काल रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. मराठी रंगभूमी, प्रायोगिक रंगभूमी, आणि आविष्कारच्या नाट्य चळवळीत कधी ना कधी सक्रिय असलेल्या प्रत्येक रंगकर्मी काकडे काकांना अखेरचा निरोप देण्यासाठी अंधेरीतील आधारवाडी स्मशानभूमीत जमला होता. नाटक हाच श्वास आणि ध्यास समजून व्रतस्थ आयुष्य जगलेल्या या व्यक्तीला आपण सगळे अखेरच्या श्वासापर्यंत नाटक करत राहू अशी ग्वाही देत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

गेले महिनाभर आपल्या आजाराने त्रस्त असलेल्या काकडे काकांनी आपला झुंजार बाणा या आजाराशी सामना करतानाही जपला होता. गेले 10 दिवस त्यांना मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र आयुष्यात कधीतरी तिसरी घंटा वाजयचीच होती. काल दुपारी अडीच वाजता ती वाजली आणि काकडे काकांच निधन झालं. प्रायोगिक नाटक जगवणे आणि ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणे हा एकच ध्यास त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत जपला.

जुन्या पिढीतील ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, ज्येष्ठ अभिनेत्री प्रेमा साखरदांडे या आविष्कारच्या सुरुवातीच्या काळातील सहकार्यासोबतच, नाना पाटेकर, सुमित राघवन, सुनील बर्वे, चंद्रकांत कुलकर्णी, शफाअत खान, राहुल रानडे, प्रशांत दळवी,अनंत पणशीकर, अरुण होरणेकर, चिन्मयी सुमित, सुहिता थत्ते तर आजच्या तरुण पिढीतील दीपक राजाध्यक्ष, सुशील इनामदार, ललित प्रभाकर, आरती वडगबालकर, कल्याणी पाठारे, ज्ञानेश झोटिंग, कैलास वाघमारे, गणेश राऊत आशा अनेक तरुणांनी काकडे काकांना श्रद्धांजली अर्पण केली. याशिवाय अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी, आणि 99 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष नाटककार प्रेमानंद गजवी हेदेखील यावेळी उपस्थित होते.

काकडे काकांच्या अंगात असलेली प्रचंड ऊर्जा आणि सकारात्मकता ते कायम पुढच्या पिढीला देत राहिले. त्यामुळे त्यांच्या पश्चात कायम नाटक करत राहण्याची शपथ सगळ्यांनी घेतली. त्यासोबत पुढच्या दोन वर्षात आविष्कार नाट्यसंस्थेला 50 वर्ष पूर्ण होत असल्याने त्यानिमित्ताने एक भव्य नाट्यमहोत्सव आयोजित करण्याचा विचार काकडे काकांच्या मनात घोळत होता. त्याची तयारी आणि स्वरूपही त्यांनी तयार करायला घेतल होत. आज काकडे काका ह्यात नसले तरीही त्यांची ही इच्छा आम्ही सगळे रंगकर्मी मिळून नक्की पूर्ण करू असे दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी यावेळी माध्यमांना सांगताना जाहीर केलं.

Body:.

Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.