ETV Bharat / sitara

'परमवीर चक्र' पुरस्कारप्राप्त अरुण खेतरपाल यांच्या बायोपिकमध्ये झळकणार वरुण धवन

author img

By

Published : Oct 14, 2019, 10:52 AM IST

या बायोपिकचं नाव अद्याप ठरलेलं नाही. मात्र, या बायोपिकसाठी दिग्दर्शक श्रीराम राघवन आणि निर्माते दिनेश विजन एकत्र येणार आहेत. दोघांनीही वरुण धवनसोबत 'बदलापूर' या चित्रपटासाठी काम केलं होतं.

'परमवीर चक्र' पुरस्कारप्राप्त अरुण खेतरपाल यांच्या बायोपिकमध्ये झळकणार वरुण धवन

मुंबई - बॉलिवूड अभिनेता वरुण धवन लवकरच परमवीर चक्र पुरस्कार प्रदान करण्यात आलेल्या अरुण खेतरपाल यांच्या बायोपिकमध्ये भूमिका साकारणार आहे. सेकंड लेफ्टनंट अरुण खेतरपाल हे भारतीय सैन्यातील अधिकारी होते. १९७१च्या भारत पाकिस्तान युद्धातील बसंतरच्या लढाईमधील दाखविलेल्या शौर्याबद्दल त्यांना 'परमवीर चक्र' हा भारताचा सर्वोच्च लष्करी बहुमान मरणोत्तर दिला गेला. त्यांची शौर्यगाथा पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

या बायोपिकचं नाव अद्याप ठरलेलं नाही. मात्र, या बायोपिकसाठी दिग्दर्शक श्रीराम राघवन आणि निर्माते दिनेश विजन एकत्र येणार आहेत. दोघांनीही वरुण धवनसोबत 'बदलापूर' या चित्रपटासाठी काम केलं होतं.

हेही वाचा -'वॉर' चित्रपटाची विदेशातही क्रेझ, हृतिकच्या 'या' चित्रपटांचा मोडला रेकॉर्ड

चित्रपट समीक्षक तरण - आदर्श यांनी या बायोपिकबद्दलची अधिकृत माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे.

वर्कफ्रंटबाबत सांगायंच तर, वरुण त्याच्या 'कुली नंबर वन'च्या रिमेकमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटात वरुणसोबत सारा अली खान ही मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटापूर्वी तो 'स्ट्रीट डान्सर'मधुनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हेही वाचा - तब्बल ६ वेळा गोविंदानं बदललं स्वत:चं नाव; केले धक्कादायक खुलासे

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.