ETV Bharat / sitara

अरुण खेत्रपाल यांच्या बायोपिकमध्ये मुख्य भूमिका साकारणार वरुण धवन

author img

By

Published : Oct 14, 2019, 11:38 PM IST

परमवीर चक्राने सन्मानित करण्यात आलेल्या लेफ्टिनेंट अरुण खेत्रपाल यांच्यावर आधारित बायोपिक बनणार आहे. वरुण धवन यात मुख्य भूमिका साकारेल. या चित्रपटाचे शीर्षक अद्याप निश्चित करण्यात आलेले नाही. याचे दिग्दर्शन 'बदलापूर' चित्रपट बनवलेले श्रीराम राघवन करीत आहेत.

Varun Dhawan playing Arun Khetarpal biopic

मुंबई - अभिनेता वरुण धवन लवकरच मोठ्या पड्यावर बायोपिक साकारताना दिसणार आहे. परमवीर चक्राने सन्मानित करण्यात आलेल्या लेफ्टिनेंट अरुण खेत्रपाल यांच्यावर आधारित हा बायोपिक असेल. या चित्रपटाचे शीर्षक अद्याप निश्चित करण्यात आलेले नाही. याचे दिग्दर्शन 'बदलापूर' चित्रपट बनवलेले श्रीराम राघवन करीत आहेत.

वरुण धवनने या बायेपिकची घोषणा आपल्या सोशल मीडियावरुन केली आहे. लेफ्टिनेंट अरुण खेत्रपाल यांचा एक फोटोही त्याने शेअर केलाय. वरुणने लिहिलंय, ''मी सैनिकाची भूमिका करावी हे माझे स्वप्न होते. हा माझा खूप महत्त्वाचा चित्रपट आहे. श्रीराम राघवन यांनी लेफ्टिनेंट अरुण खेत्रपाल यांच्यावर बायोपिक करण्याची तयारी केलीय त्याची माझ्याकडून प्रतीक्षा होत नाहीय. दिनेश विजान यांच्या चित्रपटात वेगळे व्हिजन असते, परंतु यावेळी इमोशन्सही आहेत. मुकेश खेत्रपाल आणि पूना हॉर्स यांना अभिमान वाटेल अशी आशा आहे. जय हिंद मित्रांनो, खात्री देतो की मी तुम्हाला निराश करणार नाही.''

कोण होते अरुण खेत्रपाल ?
सेकंड लेफ्टिनेंट अरुण खेत्रपाल हे भारतीय सैन्यातील अधिकारी होते. १९७१च्या भारत पाकिस्तान युद्धातील बसंतरच्या लढाईमधील दाखविलेल्या शौर्याबद्दल त्यांना परमवीर चक्र हा भारताचा सर्वोच्च लष्करी बहुमान मरणोत्तर दिला गेला.

अरुण खेत्रपाल यांच्या कुटुंबाला सैनिकी सेवेचा मोठा इतिहास आहे. त्यांचे वडील लेफ्टनंट कर्नल (नंतर ब्रिगेडियर) एम.एल. खेतरपाल भारतीय सैन्याच्या कोर ऑफ इंजिनीयर्समध्ये अधिकारी होते. अरुण खेतरपाल यांनी १९६७मध्ये राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये प्रवेश घेतला. तेथून उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी भारतीय सैनिकी अकादमीमध्ये प्रवेश घेतला. जून १९७१मध्ये त्यांना १७ पूना हॉर्सेसमध्ये तैनात केले गेले.

सैन्यात गेल्यावर सहाच महिन्यात पाकिस्तानने भारतावर आक्रमण केल्यावर युद्ध सुरू झाले. त्यावेळी १७ पूना हॉर्सेस रेजिमेंटला ४७व्या इन्फंट्री ब्रिगेडबरोबर सीमेवर पाठविण्यात आले. तेथे त्यांना बसंतर नदीवरील पूलावर ताबा मिळविण्याचा हुकुम मिळाला. ४७व्या इन्फंट्रीने पुलावर ताबा मिळविला तरी तेथील सगळा प्रदेश भूसुरुंगांनी व्यापलेला होता व त्यातून १७ पूना हॉर्सेसचे रणगाडे आणणे धोक्याचे होते. कोर ऑफ इंजिनीयर्स हे सुरुंग निकामी करीत असताना त्यांना शत्रूचे रणगाडे जवळ येत असल्याची चाहूल लागली. ते कळल्यावर भारतीय रणगाडे तशाच परिस्थितीत सुरुंग चुकवीत पुलाजवळ दाखल झाले.

परमवीर चक्र
१६ डिसेंबरला सकाळी ८ वाजता पाकिस्तानच्या १३ लान्सर या रणगाड्याच्या डिव्हिजनने आपल्या नव्याकोऱ्या पॅटन रणगाड्यांनिशी भारतीय सैन्यावर चढाई केली. पूना हॉर्सेसच्या बी स्क्वॉड्रनवर हल्ला झाल्यावर त्याच्या सेनापतीने कुमक मागवली. खेत्रपाल आणि ए स्क्वॉड्रनमधील काही रणगाडे टाकोटाक त्यांच्या मदतीला धावले. १७ पूना हॉर्सेसचे रणगाडे आणि ४७व्या इन्फंट्रीचे सेनापती हनुत सिंग राठोड यांनी पहिला हल्ला कापून काढला. शत्रूने दोन स्क्वॉड्रन एकदम भारतीय सैन्याच्या अंगावर घातल्या आणि फळी फोडत पुढे येण्यास सुरुवात केली. खेतरपाल आणि त्यांचा सहकारी रणगाडा सरसावले आणि त्यांनी पाकिस्तान्यांची ही चाल रोखून धरली. संपूर्ण स्क्वॉड्रनशी दोन हात करताना खेतरपालच्या सहकारी रणगाड्याचा सरदार कामी आला. एकट्या पडलेल्या खेतरपालच्या रणगाड्यानी लढाई सुरूच ठेवली आणि पुढे येत असलेल्या पाकिस्तानी सैनिक आणि रणगाड्यांवर थेट चाल केली आणि एक रणगाडा तोडून पाडला. इतक्यात सरदार गमावलेल्या रणगाड्यानेही खेतरपालना साथ दिली. हबकलेला शत्रू थोडा मागे होउन परत नव्या दमाने चालून आला. भारतीय रणगाड्यांनी मागे न हटता एकामागोमाग एक असे दहा पाकिस्तानी रणगाडे फोडून काढले. भारताचा दुसरा रणगाडा यात कामी आला. आता खेतरपालचा एक रणगाडा विरुद्ध पाकिस्तानची संपूर्ण स्क्वॉड्रन अशी लढाई सुरू झाली. असंख्य तोफगोळे आणि मशिनगनच्या माऱ्याने खेत्रपालचा रणगाडा हतबल झाला आणि खेत्रपालांसह रणगाड्यातील चारही सैनिक गंभीर जखमी झाले. रेडियोमन सवार नंद सिंग हे रणगाड्यातच मृत्यू पावले. चालक सवार प्रयाग सिंग आणि तोफचालक सवार नथु सिंग यांच्यासह जागचा हलू न शकणाऱ्या रणगाड्यातून खेत्रपाल यांनी तुफान मारा चालूच ठेवला. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रेडियोवरुन त्यांना रणगाडा सोडण्याचा हुकुम दिला असता त्यांनी उत्तर दिले - नाही, मी माझा रणगाडा सोडून पळणार नाही. माझी मुख्य तोफ अजून चालू आहे अन मी त्या ****ना पाहून घेतो. त्यानंतर ते एकामागोमाग पाकिस्तानी रणगाड्यांचा वेध घेत राहिले. शेवटी एकच शत्रू उरला व तो १०० मीटर वर येऊन ठाकला. दोघांनीही एकाच वेळी तोफांचा मारा केला. यात दोन्ही रणगाडे निकामी झाले आणि खेत्रपाल मृत्यू पावले. त्याआधी त्यांनी अतुलनीय पराक्रम गाजवत पाकिस्तानचे डझनावर रणगाडे उडवले आणि पाकिस्तानची व्यूहात्मक चाल उधळून लावली होती.

खेत्रपाल यांनी दाखविलेल्या या शौर्यासाठी त्यांना परमवीर चक्र देण्यात आले.

Intro:Body:Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.