ETV Bharat / sitara

'मिस्टर लेले' चित्रपटात 'या' दोन ग्लॅमरस अभिनेत्रींसोबत रोमान्स करणार वरुण - Janhvi kapoor upcoming films

बॉलिवूडच्या दोन ग्लॅमरस अभिनेत्रींसोबत तो रोमान्स करताना दिसणार आहे.

Varun Dhavan to star with Janhvi Kapoor in Mr. Lele Film
'मिस्टर लेले' चित्रपटात 'या' दोन ग्लॅमरस अभिनेत्रींसोबत रोमान्स करणार वरुण
author img

By

Published : Dec 30, 2019, 11:49 AM IST

मुंबई - अभिनेता वरुण धवन सध्या त्याच्या 'स्ट्रीट डान्सर' आणि 'कुली नंबर वन' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. नववर्षात त्याचे हे दोन्ही चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. याशिवाय आगामी 'मिस्टर लेले' या चित्रपटातही त्याची वर्णी लागली आहे. बॉलिवूडच्या दोन ग्लॅमरस अभिनेत्रींसोबत तो रोमान्स करताना दिसणार आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, 'मिस्टर लेले' या चित्रपटात वरुण धवनसोबत कियारा आडवाणी भूमिका साकारणार होती. मात्र, कियाराने तारखांचे कारण देऊन या चित्रपटातून माघार घेतली आहे. आता तिच्या जागी जान्हवी कपूर मुख्य भूमिका साकारणार आहे. अभिनेत्री भूमी पेडणेकर देखील यामध्ये मुख्य भूमिका साकारणार असल्याचं बोललं जात आहे.

हेही वाचा -महिलांच्या जीवनातील संघर्षावर भाष्य करणारे नाटक 'बाई वजा आई'

या चित्रपटाची अद्याप अधिकृत घोषणा झाली नाही. मात्र, लवकरच चित्रपट आणि चित्रपटातील कलाकारांची घोषणा करण्यात येणार आहे.

जान्हवीने 'धडक' चित्रपटातून पदार्पण केलं होतं. आता ती 'घोस्ट स्टोरीज' या वेबसीरिजमध्ये काम करणार आहे. याशिवाय गुंजन सक्सेना यांच्या जीवनावर आधारित 'कारगिल गर्ल' या चित्रपटात ती मुख्य भूमिका साकारत आहे.

याशिवाय राजकुमार रावसोबत 'रुही अफ्जा' आणि कार्तिक आर्यनसोबत 'दोस्ताना २' मध्येही ती झळकणार आहे.

हिंदीसोबतच ती तेलुगू सिनेसृष्टीतही पदार्पण करत आहे. विजय देवरकोंडासोबत ती 'फायटर' चित्रपटात दिसणार आहे.

हेही वाचा -मनीष वात्सल्य यांच्या 'स्कॉटलँड' चित्रपटाला ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकन

Intro:Body:

Varun Dhavan to star with Janhvi Kapoor in Mr. Lele Film

Varun Dhavan play role with Janhvi, Janhvi Kapoor replace kiara in Mr. Lele Film, kiara aadvani left out Mr. Lele film, Varun Dhavan upcoming film, Janhvi kapoor upcoming films, Mr. Lele Film updates

'मिस्टर लेले' चित्रपटात 'या' दोन ग्लॅमरस अभिनेत्रींसोबत रोमान्स करणार वरुण

मुंबई - अभिनेता वरुण धवन सध्या त्याच्या 'स्ट्रीट डान्सर' आणि 'कुली नंबर वन' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. नववर्षात त्याचे हे दोन्ही चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. याशिवाय आगामी 'मिस्टर लेले' या चित्रपटातही त्याची वर्णी लागली आहे. बॉलिवूडच्या दोन ग्लॅमरस अभिनेत्रींसोबत तो रोमान्स करताना दिसणार आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार, 'मिस्टर लेले' या चित्रपटात वरुण धवनसोबत कियारा आडवाणी भूमिका साकारणार होती. मात्र, कियाराने तारखांचे कारण देऊन या चित्रपटातून माघार घेतली आहे. आता तिच्या जागी जान्हवी कपूर मुख्य भूमिका साकारणार आहे. अभिनेत्री भूमी पेडणेकर देखील यामध्ये मुख्य भूमिका साकारणार असल्याचं बोललं जात आहे. 

या चित्रपटाची अद्याप अधिकृत घोषणा झाली नाही. मात्र, लवकरच चित्रपट आणि चित्रपटातील कलाकारांची घोषणा करण्यात येणार आहे. 

जान्हवीने 'धडक' चित्रपटातून पदार्पण केलं होतं. आता ती 'घोस्ट स्टोरीज' या वेबसीरिजमध्ये काम करणार आहे. याशिवाय गुंजन सक्सेना यांच्या जीवनावर आधारित 'कारगिल गर्ल' या चित्रपटात ती मुख्य भूमिका साकारत आहे. 

याशिवाय राजकुमार रावसोबत 'रुही अफ्जा' आणि कार्तिक आर्यनसोबत 'दोस्ताना २' मध्येही ती झळकणार आहे. 

हिंदीसोबतच ती तेलुगू सिनेसृष्टीतही पदार्पण करत आहे. विजय देवरकोंडासोबत ती 'फायटर' चित्रपटात दिसणार आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.