ETV Bharat / sitara

वरुण धवनने शेअर केले स्ट्रीट डान्सर गाण्याचे नवे पोस्टर - Shradha Kapoor latest news

क्या तुम बॅटल के लिए तैयार हो ? असा प्रश्न वरुणने श्रध्दा कपूरला विचारत आगामी 'स्ट्रीट डान्स थ्रीडी' चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले आहे.

Varun Dhavan s
वरुण धवन
author img

By

Published : Jan 4, 2020, 12:29 AM IST

मुंबई - आगामी 'स्ट्रीट डान्सर थ्रीडी' चित्रपटाचे नवे गाणे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. यातील नव्या गाण्याचे पोस्टर वरुणने शेअर केले आहे. या चित्रपटातील गाणी धमाल डान्सची आहेत. यापूर्वी याची झलक असलेली गाणी रिलीज झाल्यानंतर हे नवे गाणे आता प्रेक्षकांना थिरकवण्यासाठी सज्ज होत आहे.

वरुणने पोस्टर शेअर करीत कॅप्शनमध्ये लिहिलंय, ''श्रध्दा कपूर बाहेर इतकी लवकर गुंडा बनते, परंतु तुम्ही नव्या युध्दासाठी सज्ज आहात का ? #इलिगल वेपन २.० भेटूयात थिएटरमध्ये. ४ जानेवारी २०२० रोजी गाणे रिलीज होणार.''

पोस्टरमध्ये दोन टीम सज्ज झालेल्या दिसत असून एका डान्स टीममध्ये श्रध्दा कपूर दिसत आहे तर दुसऱ्यात वरुण लिड करताना दिसतोय.

अलिकडेच रिलीज झालेल्या ट्रेलरमध्ये या सिनेमात श्रध्दा कपूर पाकिस्तानी डान्स टीमची लिडर दाखवण्यात आली आहे.

दुश्मनीची ही भावना पोस्टरमध्येही दिसत आहे. दोन्ही टीम एकमेकांसोबत स्पर्धा करण्यासाठी सज्ज असल्याच्या दिसत आहेत.

'स्ट्रीट डान्स थ्रीडी' चित्रपट २४ जानेवारी रोजी रिलीज होत आहे. प्रभू देवाची यात महत्त्वाची भूमिका आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.