ETV Bharat / sitara

उपेंद्र लिमयेची ‘सलमान सोसाइटी’ मध्ये झाली एन्ट्री!

राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त अभिनेता उपेंद्र लिमये आता ‘सलमान सोसाइटी’ मध्ये दिसणार आहे, ते ही पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत. हा चित्रपट बाल शिक्षणासारख्या विषयावर भाष्य करणारा असून तो तीन लहानग्यांच्या विश्वावर बेतला आहे. या चित्रपटात पुष्कर लोणारकर, शुभम मोरे आणि विनायक पोतदार हे बालकलाकार प्रमुख भूमिकांत दिसणार आहेत.

author img

By

Published : Jan 28, 2021, 6:36 AM IST

‘सलमान सोसाइटी’ मध्ये झाली एन्ट्री!
‘सलमान सोसाइटी’ मध्ये झाली एन्ट्री!

मुंबई - राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त अभिनेता उपेंद्र लिमये आता ‘सलमान सोसाइटी’ मध्ये दिसणार आहे, ते ही पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत. हा चित्रपट बाल शिक्षणासारख्या विषयावर भाष्य करणारा असून तो तीन लहानग्यांच्या विश्वावर बेतला आहे. या चित्रपटात पुष्कर लोणारकर, शुभम मोरे आणि विनायक पोतदार हे बालकलाकार प्रमुख भूमिकांत दिसणार आहेत. यापूर्वी पुष्कर लोणारकरने एलिझाबेथ एकादशी, बाजी, रांजण, चि. व चि .सौ. कां, फिरकी आणि टी.टी.एम.एम. आदी चित्रपटांत अभिनय केलाय तर शुभम मोरेने हिंदी चित्रपट रईसमध्ये बालपणच्या शाहरुख़ खानची भूमिका वठवली होती. तसेच हाफ टिकिट, फास्टर फेणे सारख्या चित्रपटांतूनही झळकला होता. बाल कलाकार विनायक पोतदार याने हाफ टिकिट, माउली, ताजमहल आणि येरे येरे पावसामध्ये भूमिका केल्या आहेत.

बालशिक्षणावर परखड भाष्य

दिग्दर्शक कैलाश काशीनाथ पवार यांच्या या पहिल्या मराठी सिनेमाचा मुहूर्त अभिनेता सोनू सूदच्या उपस्थितीत पार पडला होता. 'पढेगा इंडिया तो बढेगा इंडिया' अशी टॅगलाइन असलेला हा सिनेमा भारतातील शिक्षण व्यवस्थेवर, खास करून बालशिक्षणावर परखड भाष्य करणारा आहे. ‘सलमान सोसाइटी’ मध्ये उपेंद्र लिमये एक पाहुणा कलाकार असून त्याने आपल्या भूमिकेचे डबिंग नुकतेच पूर्ण केले. त्याचे स्वागत करण्यासाठी चित्रपटाचे निर्माते श्री शांताराम भोंडवे यावेळी आवर्जून उपस्थित होते.

Upendra Limaye's entry in 'Salman Society'!
‘सलमान सोसाइटी’ मध्ये झाली एन्ट्री!
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी प्रहसन-कार्यक्रमामधून नावारूपास आलेले गौरव मोरे आणि नम्रता आवटे ‘सलमान सोसायटी’ मध्ये एका वेगळ्या आणि महत्वपूर्ण भूमिकेत दिसतील. या चित्रपटाचे चित्रीकरण आटपाडी, नाशिक, नवी मुंबई आणि मुंबईत झाले असून थोडेसेच चित्रण बाकी आहे जे लवकरच पूर्ण करण्यात येईल, असा विश्वास पूर्ण टीमला आहे. ‘सलमान सोसायटी’ याच वर्षी प्रदर्शित करण्याचा मानस निर्मात्यांनी व्यक्त केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.