ETV Bharat / sitara

बिग बजेट 'येरे येरे पैसा 2'चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित - तगडी स्टारकास्ट

चित्रपटाच्या रंगतदार कथानकासह लक्ष वेधून घेतात ते खटकेबाज संवाद. अनेक टाळीबाज आणि पोट धरून हसायला लावणारे संवाद आणि प्रसंग यात पाहायला मिळतात.

'येरे येरे पैसा 2'चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित
author img

By

Published : Jul 29, 2019, 12:59 PM IST

मुंबई - लंडनमध्ये चित्रीकरण, महागड्या गाड्या आणि हेलिकॉप्टर्सचा तामझाम, धडाकेबाज अॅक्शन सिक्वेन्स, उच्च निर्मितीमूल्य, तगडी स्टारकास्ट आणि खटकेबाज संवाद... हे सगळं वर्णन हिंदी चित्रपटाचं नाही, तर ९ ऑगस्टला प्रदर्शित होणाऱ्या "ये रे ये रे पैसा २" या मराठी चित्रपटाचं आहे.

अमेय विनोद खोपकर प्रस्तुत आणि हेमंत ढोमे दिग्दर्शित या चित्रपटाचा दमदार ट्रेलर सोशल मीडियाद्वारे प्रदर्शित करण्यात आला आहे. कर्ज बुडवून पळून गेलेला उद्योजक आणि त्याचा शोध घेणारे अण्णा अन् त्यांचे अतरंगी साथीदार यांची गोष्ट "ये रे ये रे पैसा २" मध्ये पाहायला मिळणार असल्याचं या ट्रेलरमधून दिसतं. मात्र चित्रपटाच्या रंगतदार कथानकासह लक्ष वेधून घेतात ते खटकेबाज संवाद. अनेक टाळीबाज आणि पोट धरून हसायला लावणारे संवाद आणि प्रसंग यात पाहायला मिळतात.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

या चित्रपटात संजय नार्वेकर, प्रियदर्शन जाधव, अनिकेत विश्वासराव, प्रसाद ओक, पुष्कर श्रोत्री, आनंद इंगळे, मृणाल कुलकर्णी, मृण्मयी गोडबोले, विशाखा सुभेदार, स्मिता गोंदकर अशी दमदार स्टारकास्ट आहे. संजय मेमाणे यांनी छायांकन, फैजल इमरान यांनी संकलन, ट्रॉय आरिफ यांनी संगीत आणि पार्श्वसंगीत, सुनील नवले यांनी रंगभूषा, सचिन लोवलेकर यांनी वेशभूषा तर राहुल-संजीव यांनी या सिनेमाचं नृत्यदिग्दर्शन केलं आहे. गायक अवधूत गुप्ते, मुग्धा कऱ्हाडे, शाल्मली खोलगडे आणि मिक्का सिंग यांनी या चित्रपटातील गाणी गायली आहेत. येत्या ९ ऑगस्टला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Intro:

(सिनेमचया ट्रेलरची लिंक व्हाट्सएपच्या डेस्क नंबर वर पाठवली आहे कृपया वापरावी)
लंडननध्ये चित्रीकरण, महागड्या गाड्या आणि हेलिकॉप्टर्सचा तामझाम, धडाकेबाज अॅक्शन सिक्वेन्स, उच्च निर्मितीमूल्य, तगडी स्टारकास्ट आणि खटकेबाज संवाद... हे सगळं वर्णन हिंदी चित्रपटाचं नाही, तर ९ ऑगस्टला प्रदर्शित होणाऱ्या "ये रे ये रे पैसा २" या मराठी चित्रपटाचं आहे!

अमेय विनोद खोपकर प्रस्तुत आणि हेमंत ढोमे दिग्दर्शित या चित्रपटाचा दमदार ट्रेलर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आला. कर्ज बुडवून पळून गेलेला उद्योजक आणि त्याचा शोध घेणाऱ्या अण्णा आणि त्याचे अतरंगी साथीदार यांची गोष्ट "ये रे ये रे पैसा २" मध्ये पहायला मिळणार असल्याचं या ट्रेलरमधून दिसतं. मात्र चित्रपटाच्या रंगतदार कथानकासह लक्ष वेधून घेतात ते खटकेबाज संवाद... अनेक टाळीबाज आणि पोटधरू हसायला लावणारे संवाद आणि प्रसंग ट्रेलरमध्ये दिसतात . तर आजपर्यंत मराठी चित्रपटात न दिसलेली भव्यता आणि चकचकीतपणाही या चित्रपटात आहे. त्यामुळे या चित्रपटाविषयीचं कुतूहल आता आणखीच वाढलं आहे.

‘ये रे ये रे पैसा २’ ची निर्मिती अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट, पर्पल बुल एंटरटेनमेंट, ट्रान्स एफएक्स स्टुडिओज आणि पॅनारोमा स्टुडिओज यांनी केली आहे. हृषिकेश कोळी यांनी पटकथा संवाद लेखन केलं आहे. या चित्रपटात अभिनेते "ये रे ये रे पैसा २" या चित्रपटाद्वारे एव्हीके एंटरटेनमेंटच्या अमेय विनोद खोपकर यांनी आकाश पेंढारकर आणि अंकित चंदीरामानी यांच्यासोबत आता वितरण क्षेत्रातही पाऊल टाकले आहेत.

या चित्रपटात अभिनेते संजय नार्वेकर, प्रियदर्शन जाधव, अनिकेत विश्वासराव, प्रसाद ओक, पुष्कर श्रोत्री, आनंद इंगळे, मृणाल कुलकर्णी, मृण्मयी गोडबोले, विशाखा सुभेदार, स्मिता गोंदकर अशी दमदार स्टारकास्ट आहे. संजय मेमाणे यांनी छायांकन, फैजल इमरान यांनी संकलन, ट्रॉय आरिफ यांनी संगीत आणि पार्श्वसंगीत, सुनील नवले यांनी रंगभूषा, सचिन लोवलेकर यांनी वेशभूषा, राहुल-संजीव यांनी नृत्यदिग्दर्शन केलं आहे. गायक अवधूत गुप्ते, मुग्धा कऱ्हाडे, शाल्मली खोलगडे आणि मिक्का सिंग यांनी या चित्रपटातील गाणी गायली आहेत.

येत्या ९ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Body:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.