ETV Bharat / sitara

निखळ मनोरंजनाचा तडका असलेल्या 'हाऊसफुल ४'चा ट्रेलर प्रदर्शित - pooja hegade

'हाऊसफुल', 'हाऊसफुल २' आणि 'हाऊसफुल ३' या तीनही चित्रपटांनी प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन केलं आहे. कॉमेडीचा तडका आणि आपल्या कॉमिक टायमिंगने या चित्रपटातील कलाकार पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाले आहेत.

निखळ मनोरंजनाचा तडका असलेल्या 'हाऊसफुल ४'चा ट्रेलर प्रदर्शित
author img

By

Published : Sep 27, 2019, 2:54 PM IST

मुंबई - अभिनेता अक्षय कुमार, रितेश देशमुख आणि बॉबी देओल यांची मुख्य भूमिका असलेल्या 'हाऊसफुल ४' चित्रपटाची बऱ्याच काळापासून प्रतीक्षा आहे. अलिकडेच या चित्रपटातील कलाकारांचे हटके लूक प्रदर्शित करण्यात आले आहेत. तसेच, या चित्रपटाचे पोस्टरही प्रदर्शित झालं आहे. चित्रपटाच्या पोस्टरवरुन या चित्रपटाची उत्सुकता आणखी वाढली होती. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित करण्यात आला आहे.

'हाऊसफुल', 'हाऊसफुल २' आणि 'हाऊसफुल ३' या तीनही चित्रपटांनी प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन केलं आहे. कॉमेडीचा तडका आणि आपल्या कॉमिक टायमिंगने या चित्रपटातील कलाकार पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाले आहेत. 'हाऊसफुल ४' या चित्रपटाकडूनही प्रेक्षकांच्या फार अपेक्षा आहेत.

हेही वाचा-'धकधक गर्ल'सोबत 'देसी गर्ल'चा धमाल 'पिंगा', पाहा व्हिडिओ

'हाऊसफुल ४'च्या ट्रेलरमध्येही धमाल कॉमेडी पाहायला मिळते. अभिनेत्री, क्रिती सेनॉन, पुजा हेगडे आणि क्रिती खारबांदा यांची देखील या चित्रपटात मुख्य भूमिका आहे.दिग्दर्शक फरहाद समजी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. तर, साजिद नादियाडवाला यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

दिवाळीच्या पर्वावर हा चित्रपट प्रदर्शित होईल.

हेही वाचा -'आराधना' गोल्डन जुबली: 'असा' चित्रपट ज्याने हिंदी सिनेसृष्टीचा चेहरामोहरा बदलला

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.