ETV Bharat / sitara

टॉम क्रूझच्या आगामी सिनेमाचे शूटिंग होणार अंतराळात, नासाने दिला दुजोरा

author img

By

Published : May 8, 2020, 1:54 PM IST

टॉम क्रूझ आता स्पेसमध्ये शूटिंग करताना दिसणार आहे. टॉम आणि अ‌ॅलन मस्क सध्या स्पेस एक्स आणि नासासोबत काम करीत आहेत. याचे शूटिंग अंतराळात होणार आहे. नासाचे व्यवस्थापक जिम ब्रिडेन्सटाईन यांनी याला दुजोरा दिला आहे.

TOM-CRUISE
टॉम क्रूझ

वॉशिंग्टन - हॉलिवूड स्टार टॉम क्रूझ आपला आगामी सायन्स फिक्शन चित्रपट अंतराळात शूट करणार आहे. याच्या काही बातम्या यापूर्वी प्रसिध्द झाल्या होत्या. आता या गोष्टीला नासाने संमती दिल्यामुळे टॉम क्रूझचा उत्साह वाढला आहे.

क्रूझ याला अ‌ॅक्शन चित्रपटांसाठी नावाजले जाते. त्यामुळे पहिल्यांदाच त्याच्या अ‌ॅक्शनचा जलवा अंतराळात पाहायला मिळणार आहे. रिपोर्टनुसार या चित्रपटाची कथा अंतराळावर आधारित असेल. हा एक अ‌ॅक्शन आणि अ‌ॅडव्हेन्चर्स सिनेमा असेल. टॉम क्रूझ यासाठी अ‌ॅलन मस्कची कंपनी स्पेस एक्स आणि नासासोबत बातचित करीत आहे.

हेही वाचा- बहुप्रतीक्षित क्रोमॅटीका अल्बम 'या' दिवशी होणार प्रदर्शित, लेडी गागाची घोषणा

नासाचे अ‌ॅडमिनीस्ट्रेटर जिम यांनी या बातमीला दुजोरा देताना एक ट्विट केले आहे. यात त्यांनी लिहिलंय, ''टॉम क्रूझच्या आगामी सिनेमाचे शूटिंग अंतराळात होणार असल्यामुळे नासा उत्साहात आहे.''

हा चित्रपट बनला तर पृथ्वीपासून दूर अंतराळात शूट झालेला हा पहिला चित्रपट ठरेल आणि अंतराळात जाऊन शूट करणारा टॉम क्रूझ हा पहिला अभिनेता ठरेल.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.