ETV Bharat / sitara

बॉलिवूडच्या पहिल्याच चित्रपटात तेजश्रीचा लिपलॉक, 'बबलू बॅचलर'चा ट्रेलर प्रदर्शित - Tejashree Pradhan Liplock with Sharman joshi

काही दिवसांपूर्वीच तेजश्रीने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर या चित्रपटाचे पहिले पोस्टर शेअर केले होते. तिने कोणताही गाजावाजा न करता बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले आहे.

Tejashree Pradhan Liplock in Babloo Bachelor, trailer out
बॉलिवूडच्या पहिल्याच चित्रपटात तेजश्रीचा लिपलॉक, 'बबलू बॅचलर'चा ट्रेलर प्रदर्शित
author img

By

Published : Feb 11, 2020, 2:43 PM IST

मुंबई - मालिका, नाटक आणि मराठी चित्रपटातून आपल्या अभिनयाची दमदार छाप उमटवणारी अभिनेत्री तेजश्री प्रधान आपल्या पहिल्या वहिल्या बॉलिवूड चित्रपटासाठी सज्ज झाली आहे. विशेष म्हणजे अभिनेता शर्मन जोशीसोबत ती मुख्य भूमिकेत झळकणार आहे. 'बबलू बॅचलर' असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित झाला आहे.

काही दिवसांपूर्वीच तेजश्रीने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर या चित्रपटाचे पहिले पोस्टर शेअर केले होते. तिने कोणताही गाजावाजा न करता बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले आहे. मात्र, ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर ती एका कारणामुळे चर्चेत आली आहे. आपल्या पहिल्याच बॉलिवूड चित्रपटात तेजश्रीने शर्मन जोशीसोबत लिपलॉक किस दिला आहे. त्यामुळे चाहत्यांच्या भुवया उंचावलेल्या पाहायला मिळत आहेत.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

हेही वाचा - तब्बल १० वर्षांच्या विश्रांतीनंतर सुष्मिता सेनचे रुपेरी पडद्यावर पुनरागमन

तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तेजश्रीने या ट्रेलरची लिंक शेअर केल्यानंतर बऱ्याच नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.

तेजश्री आणि शर्मन जोशीसोबत पूजा चोप्रा आणि राजेश शर्मा यांचीदेखील मुख्य भूमिका या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

अजय राजवानी यांची निर्मिती असलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शन अग्निदेव चॅटर्जी यांनी केले आहे. २० मार्च ला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा - बिग बी आणि विक्रम गोखले यांचा याराना, 'या' चित्रपटात येणार एकत्र

Intro:Body:

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.