मुंबई - छोट्या पडद्यावरील सुप्रसिद्ध झालेला अभिनेता विक्रांत मेस्सी अलिकडेच दीपिका पदुकोणसोबत 'छपाक' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. विक्रांतने छोट्या पडद्यावरील मालिकांसोबतच डिजिटल माध्यमातूनही आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. त्यामुळेच मोठ्या पडद्यावर त्याची वर्णी लागली आहे. आता तापसीसोबतदेखील तो 'हसिन दिलरुबा' चित्रपटात भूमिका साकारताना दिसणार आहे.
'हसिन दिलरूबा' हा चित्रपट गूढ हत्येवर आधारित आहे. अभिनेत्री तापसी पन्नू यामध्ये मुख्य भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. विक्रांत मेस्सी आणि तापसी पन्नु यांनी मुहुर्त शॉटचा फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केला आहे.
-
#TaapseePannu and #VikrantMassey... #HaseenDillruba filming begins today... Directed by Vinil Mathew... Produced by Aanand L Rai and Himanshu Sharma... Eros International presentation... 18 Sept 2020 release. pic.twitter.com/uDnd3W3ww4
— taran adarsh (@taran_adarsh) January 18, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#TaapseePannu and #VikrantMassey... #HaseenDillruba filming begins today... Directed by Vinil Mathew... Produced by Aanand L Rai and Himanshu Sharma... Eros International presentation... 18 Sept 2020 release. pic.twitter.com/uDnd3W3ww4
— taran adarsh (@taran_adarsh) January 18, 2020#TaapseePannu and #VikrantMassey... #HaseenDillruba filming begins today... Directed by Vinil Mathew... Produced by Aanand L Rai and Himanshu Sharma... Eros International presentation... 18 Sept 2020 release. pic.twitter.com/uDnd3W3ww4
— taran adarsh (@taran_adarsh) January 18, 2020
हेही वाचा - 'असा' होता दीपिकाचा 'मालती' बनण्यापर्यंतचा प्रवास...
काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचं फर्स्ट लूक पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. तापसीने या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले होते. 'मिले तो दिल जवाँ निसार हो गया, शिकारी ख़ुद यहाँ, शिकार हो गया', असे कॅप्शन तिने या पोस्टरवर दिले आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
हा चित्रपट एक ट्विस्ट असणारी लव्ह स्टोरी राहणार आहे. प्रेक्षकांसाठी ही कथा नक्कीच नवीन असेल. तसेच, हा चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करेल, असे आनंद एल. राय यांनी म्हटले आहे.
हेही वाचा -आमच्या काळजाच्या तुकड्याला भेटा...! कपील शर्माने शेअर केला 'अनायरा'चा पहिला फोटो
विनित मॅथ्यू हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. त्यांनी यापूर्वी 'हंसी तो फसी', 'मनमर्जिया' आणि 'जजमेंटल है क्या' यांसाख्या चित्रपटाच्या कथा लिहिल्या आहेत. आता 'हसीन दिलरूबा' या मर्डर मिस्ट्री असलेल्या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा ते सांभाळणार आहेत.
अमित त्रिवेदी हे या चित्रपटाला संगीत देणार आहेत. १८ सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होईल.
हेही वाचा -रणबीर कपूरसोबत जमणार श्रध्दा कपूरची जोडी, श्रध्दाचा उत्साह द्विगुणीत