मुंबई - अजय देवगनची मुख्य भूमिका असलेला 'तान्हाजी - द अनसंग वॉरिअर' या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर दमदार प्रतिसाद मिळाला आहे. पहिल्या दिवसापासूनच या चित्रपटाने प्रेक्षकांवर छाप पाडली. प्रदर्शनानंतर एकाच आठवड्यात या चित्रपटाने १०० कोटींचा गल्ला जमवला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे एकनिष्ठ मावळे तानाजी मालुसरे यांनी आपल्या प्राणाची बाजी लावून कोंढाणा किल्ला सर करण्यासाठी प्रयत्न केले होते. कोंढाणासाठी त्यांनी त्यांच्या मुलाचे लग्न देखील बाजुला ठेवले होते. तानाजींची हीच शौर्यकथा 'तान्हाजी - द अनसंग वॉरिअर' या चित्रपटातून पुन्हा एकदा पडद्यावर पाहायला मिळाली आहे.
हेही वाचा -'तान्हाजी'नंतर 'या' शार्टफिल्ममध्ये झळकणार काजोल, फर्स्ट लुक प्रदर्शित
पहिल्या दिवशी या चित्रपटाने १५.१० कोटीची कमाई केली होती. त्यानंतर शनिवार आणि रविवार मिळून २०.५७ आणि २६.२६ कोटींचा गल्ला जमवत अर्धशतक गाठले होते. त्यानंतर एकाच आठवड्यात या चित्रपटाने १०७ कोटींचा व्यवसाय केला आहे.
-
#Tanhaji is 💯 NOT OUT... Day 6 is higher than Day 1, 4 and 5... Terrific trending on weekdays indicates the power of solid content... Speeding towards ₹ 150 cr... Fri 15.10 cr, Sat 20.57 cr, Sun 26.26 cr, Mon 13.75 cr, Tue 15.28 cr, Wed 16.72 cr. Total: ₹ 107.68 cr. #India biz
— taran adarsh (@taran_adarsh) January 16, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#Tanhaji is 💯 NOT OUT... Day 6 is higher than Day 1, 4 and 5... Terrific trending on weekdays indicates the power of solid content... Speeding towards ₹ 150 cr... Fri 15.10 cr, Sat 20.57 cr, Sun 26.26 cr, Mon 13.75 cr, Tue 15.28 cr, Wed 16.72 cr. Total: ₹ 107.68 cr. #India biz
— taran adarsh (@taran_adarsh) January 16, 2020#Tanhaji is 💯 NOT OUT... Day 6 is higher than Day 1, 4 and 5... Terrific trending on weekdays indicates the power of solid content... Speeding towards ₹ 150 cr... Fri 15.10 cr, Sat 20.57 cr, Sun 26.26 cr, Mon 13.75 cr, Tue 15.28 cr, Wed 16.72 cr. Total: ₹ 107.68 cr. #India biz
— taran adarsh (@taran_adarsh) January 16, 2020
या चित्रपटाला प्रेक्षकांसोबतच चित्रपट समीक्षकांनीही चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. उत्तरप्रदेश, हरियाणा यांसारख्या राज्यात हा चित्रपट टॅक्स फ्री देखील करण्यात आला आहे. त्याचाही फायदा चित्रपटाला मिळत आहे.
हेही वाचा -'तान्हाजी' उत्तरप्रदेशमध्ये टॅक्स फ्री, काजोलने मानले सरकारचे आभार
या चित्रपटात अजय देवगनसोबतच काजोल, सैफ अली खान, शरद केळकर यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत. ओम राऊत यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर, टी सीरिज अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.
-
#OneWordReview...#Tanhaji: SUPERB.
— taran adarsh (@taran_adarsh) January 9, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Rating: ⭐️⭐️⭐️⭐️
Drama, emotions, conflict, action, VFX, #Tanhaji is an enthralling experience... Electrifying climax... Top notch direction... #Ajay, #Kajol, #Saif in super form... Get ready for 2020’s first ₹ 💯cr+ film. #TanhajiReview pic.twitter.com/N9TwWsWazd
">#OneWordReview...#Tanhaji: SUPERB.
— taran adarsh (@taran_adarsh) January 9, 2020
Rating: ⭐️⭐️⭐️⭐️
Drama, emotions, conflict, action, VFX, #Tanhaji is an enthralling experience... Electrifying climax... Top notch direction... #Ajay, #Kajol, #Saif in super form... Get ready for 2020’s first ₹ 💯cr+ film. #TanhajiReview pic.twitter.com/N9TwWsWazd#OneWordReview...#Tanhaji: SUPERB.
— taran adarsh (@taran_adarsh) January 9, 2020
Rating: ⭐️⭐️⭐️⭐️
Drama, emotions, conflict, action, VFX, #Tanhaji is an enthralling experience... Electrifying climax... Top notch direction... #Ajay, #Kajol, #Saif in super form... Get ready for 2020’s first ₹ 💯cr+ film. #TanhajiReview pic.twitter.com/N9TwWsWazd
हेही वाचा -'तान्हाजी' चित्रपट टॅक्स फ्री करण्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करणार - हसन मुश्रीफ