ETV Bharat / sitara

'सैरा' चित्रपटातील तम्मन्नाची खास झलक, शेअर केला व्हिडिओ - tamannaah bhatia news

तमन्ना या चित्रपटात लक्ष्मी हे पात्र साकारताना दिसणार आहे.तिची झलक असलेला एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

'सैरा' चित्रपटातील तम्मन्नाची खास झलक, शेअर केला व्हिडिओ
author img

By

Published : Sep 23, 2019, 8:16 AM IST

मुंबई - दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटिया लवकरच 'सैरा नरसिंह रेड्डी' या चित्रपटात झळकणार आहे. एतिहासिक विषय असलेल्या या चित्रपटात महानायक अमिताभ बच्चन, चिरंजीवी यांच्यासोबत तगडी स्टारकास्ट दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित झाला. शिवाय, यातील कलाकारांचे लूकही समोर आले होते. आता तमन्नाने तिची झलक असलेला एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

'सैरा नरसिंह रेड्डी' हा चित्रपट बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. चिरंजीवी आणि अमिताभ बच्चन या दोघांनाही एकत्र पाहण्यासाठी चाहत्यांना या चित्रपटाची आतुरता आहे. हा एक पिरिअड ड्रामा आहे. १८८० च्या काळातील आंध्र प्रदेशातील एका लढाऊ योद्ध्याची ही कथा आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात ब्रिटीशांविरुध्द एल्गार पुकारणााऱ्या स्वातंत्र्य सैनिकाची ही सत्यकथा आहे.

हेही वाचा -पाहा, थरारक अॅक्शन, नेत्रदिपक दृष्ये आणि वेड लावणारी भव्यता असलेला 'सैरा'चा ट्रेलर

सुरेंद्र रेड्डी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून राम चरण या चित्रपटाचा निर्माता आहे. या चित्रपटाचे शूटींग गेली ३ वर्षे सुरू होते. हा एक बिग बजेट चित्रपट आहे. यातील फाईटच्या एका सीनसाठी तब्बल ४५ कोटी रुपये खर्च झाला आहे. यावरुन चित्रपटासाठी किती मेहनत घेतली गेली आहे याचा अंदाज येऊ शकतो.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

तमन्ना या चित्रपटात लक्ष्मी हे पात्र साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाचं बजेटही २७० कोटीच्या आसपास आहे. यामध्ये भरपूर स्पेशल इफेक्ट्स, तंत्रज्ञान आणि व्हिएफएक्सचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे या चित्रपटात भव्यदिव्यता पाहता येणार आहे.

हेही वाचा -साऱ्या भारताला वेड लावण्यासाठी अमिताभ, चिरंजीवीसह 'सुपरस्टार्स'चा 'सैरा' येतोय

सुपरस्टार चिरंजीवी, के. सुदिप, विजय सेतुपती, जगपतीबाबू, नयनतारा, तमन्ना आणि अनुष्का शेट्टी यांच्या यात प्रमुख भूमिका आहेत. अमिताभ बच्चन यांची यात विशेष भूमिका असेल. २ ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.