मुंबई - दिग्दर्शक करण जोहर बॉलिवूडची आघाडीची स्टारकास्ट घेऊन भव्यदिव्य अशा 'तख्त' चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. मागच्या वर्षी या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. या चित्रपटाची कथा ऐतिहासिक पार्श्वभूमीवर आधारित आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. तसेच, या चित्रपटाची पहिली झलक सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहे.
-
#Takht filming begins March 2020.
— taran adarsh (@taran_adarsh) February 1, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#Takht filming begins March 2020.
— taran adarsh (@taran_adarsh) February 1, 2020#Takht filming begins March 2020.
— taran adarsh (@taran_adarsh) February 1, 2020
'तख्त' चित्रपटात रणवीर सिंग, करिना कपूर खान, आलिया भट्ट, विकी कौशल, भूमी पेडणेकर, जान्हवी कपूर आणि अनिल कपूर यांची मुख्य भूमिका या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. पुढच्या वर्षी २४ डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा -'तख्त'च्या लोकेशनचा शोध संपला, करण जोहरने शेअर केला फोटो
दरम्यान काही दिवसांपूर्वीच करण जोहरने या चित्रपटाच्या शूटिंग लोकेशनचा फोटो शेअर केला होता. ताजमहल समोर उभे राहून एक फोटो घेतला. हेच आपले आगामी 'तख्त' सिनेमाचे लोकेशन असणार असल्याचे त्याने सांगितले होते.
-
Location scouting... #Takht #India locations finalized... Next stop: #Europe... Karan Johar directs the multi-starrer. pic.twitter.com/yMKdlbB08R
— taran adarsh (@taran_adarsh) January 11, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Location scouting... #Takht #India locations finalized... Next stop: #Europe... Karan Johar directs the multi-starrer. pic.twitter.com/yMKdlbB08R
— taran adarsh (@taran_adarsh) January 11, 2020Location scouting... #Takht #India locations finalized... Next stop: #Europe... Karan Johar directs the multi-starrer. pic.twitter.com/yMKdlbB08R
— taran adarsh (@taran_adarsh) January 11, 2020
'तख्त' चित्रपटाच्या शूटींगच्या पहिल्या टप्प्याला मार्च महिन्यात सुरुवात होणार आहे. या चित्रपटाची कथा शाहजहाचा पहिला मुलगा दारा शिकोह आणि तिसरा मुलगा औरंगजेब यांच्यातील लढाईची आहे.
हेही वाचा -अशी असणार 'तख्त'मधील आलियाची भूमिका, विकीचा खुलासा
दारा शिकोहची भूमिका रणवीर सिंग साकारणार आहे तर औरंगजेबच्या भूमिकेत विकी कौशल दिसणार आहे. यात आलिया विकी कौशलसोबत ऑन्सक्रीन रोमांस करताना दिसणार आहे.
हिरू यश जोहर, करण जोहर आणि अपूर्वा मेहता हे या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. तर, करण जोहरच्या दिग्दर्शनाखाली हा चित्रपट तयार होणार आहे. ऐतिहासिक कथानकावर आधारित बिग बजेट चित्रपट आणि त्यासोबतच मोठी स्टारकास्ट यामुळे प्रेक्षकांना या चित्रपटाबद्दल उत्सुकता लागली आहे.
हेही वाचा -आलिया-रणवीरची 'तख्त'साठी तयारी, शेअर केला व्हिडिओ