ETV Bharat / sitara

सुनील गावस्करांच्या भूमिकेत ताहीर राज भसीन, पाहा '८३'चं पोस्टर

ताहीरने सुनील गावस्कर यांच्या लूकमधला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Tahir Raj Bhasin as Sunil Gavaskar, poster release
सुनील गावस्करांच्या भूमिकेत ताहीर राज भसीन, पाहा '८३'चं पोस्टर
author img

By

Published : Jan 11, 2020, 12:20 PM IST

मुंबई - क्रिकेट विश्वचषक सामन्यामध्ये ऐतिहासिक ठरलेल्या १९८३ सालच्या विश्वचषकावर आधारित '८३' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात रणवीर सिंग हा कपिल देव यांच्या भूमिकेत मुख्य भूमिका साकारत आहे. तर, ताहीर राज भसीन हा लिटिल मास्टर सुनील गावस्कर यांच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकताच त्याचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे.

ताहीरने सुनील गावस्कर यांच्या लूकमधला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. 'ज्यांच्या फलंदाजीने शत्रूंचे छक्के उडले, अशा लिटिल मास्टर यांच्या भूमिकेत', असे कॅप्शन त्याने या फोटोवर दिले आहे.

हेही वाचा -आयफा पुरस्कार सोहळ्यात मध्यप्रदेश सरकार करणार दीपिकाचा सन्मान

२५ जून १९८३ साली भारताने प्रथमच विश्वचषक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली होती. १९७५ आणि १९७९ च्या विश्वचषकातील भारताची कामगिरी पाहता या स्पर्धेत कपिलदेव आणि त्यांच्या सहकार्‍यांकडून फारशा अपेक्षा नव्हत्या. मात्र, या संघाने चमत्कार घडवून देशवासियांचे स्वप्न पूर्ण केले. याच विश्वचषक सामन्यावर आधारित कबिर खान दिग्दर्शित '८३' हा चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

'८३' चित्रपटात रणवीरशिवाय आदिनाथ कोठारे, एमी विर्क, चिराग पाटील, साकीब सलीम, ताहिर भसीन, जतिन सरना, जीवा, साहिल खट्टर, पंकज त्रिपाठी हे कलाकार देखील भूमिका साकारत आहेत.

हेही वाचा -कंगनाने घेतला इंग्रजी भाषेशी 'पंगा,' पाहा व्हिडिओ

माजी क्रिकेट कर्णधार कृष्णमाचारी श्रीकांत यांची भूमिका दाक्षिणात्य अभिनेता जीवा साकारणार आहे. साहिल खट्टर माजी यष्टीरक्षक सय्यद किरमानी यांच्या भूमिकेत आहे. पंजाबी अभिनेता एमी विर्कही या चित्रपटामध्ये झळकणार आहे. मान सिंग यांच्या भूमिकेत पंकज त्रिपाठी आणि सुनील गावस्कर यांची भूमिका अभिनेता ताहिर भसीन साकारणार आहे. तर, आदिनाथच्या बरोबरीने चिराग पाटील हा त्याचेच वडील संदिप पाटील यांच्या भूमिकेत दिसणार आहे.

काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. १० एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होईल.

हेही वाचा -इशान खट्टर म्हणतो 'या' अभिनेत्रीसोबत ऑनस्क्रिन रोमान्स करणे सोपे

Intro:Body:

Tahir Raj Bhasin as Sunil Gavaskar, poster release

#TahirRajBhasin, #SunilGavaskar, Character poster of Tahir Raj Bhasin, #83TheFilm, 83 the film, 83 starcast, 83 film release date, सुनील गावस्करांच्या भूमिकेत ताहीर राज भसीन, ८३ film poster, ranveer singh in 83, kabir khan, ताहीर राज भसीन

सुनील गावस्करांच्या भूमिकेत ताहीर राज भसीन, पाहा '८३'चं पोस्टर

मुंबई - क्रिकेट विश्वचषक सामन्यामध्ये ऐतिहासिक ठरलेल्या १९८३ सालच्या विश्वचषकावर आधारित '८३' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात रणवीर सिंग हा कपिल देव यांच्या भूमिकेत मुख्य भूमिका साकारत आहे. तर, ताहीर राज भसीन हा लिटिल मास्टर सुनील गावस्कर यांच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकताच त्याचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. 

ताहीरने सुनील गावस्कर यांच्या लूकमधला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. 'ज्यांच्या फलंदाजीने शत्रूंचे छक्के उडले, अशा लिटिल मास्टर यांच्या भूमिकेत', असे कॅप्शन त्याने या फोटोवर दिले आहे. 

२५ जून १९८३ साली भारताने प्रथमच विश्वचषक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली होती. १९७५ आणि १९७९ च्या विश्वचषकातील भारताची कामगिरी पाहता या स्पर्धेत कपिलदेव आणि त्यांच्या सहकार्‍यांकडून फारशा अपेक्षा नव्हत्या. मात्र, या संघाने चमत्कार घडवून देशवासियांचे स्वप्न पूर्ण केले. याच विश्वचषक सामन्यावर आधारित कबिर खान दिग्दर्शित '८३' हा चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 

'८३' चित्रपटात रणवीरशिवाय आदिनाथ कोठारे, एमी विर्क, चिराग पाटील, साकीब सलीम, ताहिर भसीन, जतिन सरना, जीवा, साहिल खट्टर, पंकज त्रिपाठी हे कलाकार देखील भूमिका साकारत आहेत. 

माजी क्रिकेट कर्णधार कृष्णमाचारी श्रीकांत यांची भूमिका दाक्षिणात्य अभिनेता जीवा साकारणार आहे. साहिल खट्टर माजी यष्टीरक्षक सय्यद किरमानी यांच्या भूमिकेत आहे. पंजाबी अभिनेता एमी विर्कही या चित्रपटामध्ये झळकणार आहे. मान सिंग यांच्या भूमिकेत पंकज त्रिपाठी आणि सुनील गावस्कर यांची भूमिका अभिनेता ताहिर भसीन साकारणार आहे. तर, आदिनाथच्या बरोबरीने चिराग पाटील हा त्याचेच वडील संदिप पाटील यांच्या भूमिकेत दिसणार आहे.

काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. १० एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होईल. 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.